- ऋजुता लुकतुके
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने नोव्हेंबरमध्येच हा निर्णय घेतला होता. आता त्याची अंमलबजावणी होणार आहे. (UPI Accounts)
तुम्ही पेटीएम, फोनपे किंवा गुगल पे यापैकी एखादं किंवा कुठलंही इतर युपीआय ॲप एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वापरलेलं नसेल, तर १ जानेवारीपासून असं खातं बंद होणार आहे. वापरात नसलेली युपीआय खाती टप्प्या टप्प्याने बंद करण्याचे निर्देश नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने ७ नोव्हेंबरलाच एक पत्रक काढून दिले होते. आणि १ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश दिले होते. (UPI Accounts)
(हेही वाचा – DGP : १ जानेवारी रोजी डीजीपीचा पदभार स्वीकारतील ‘हे’ ज्येष्ठ आयपीएस अधिकारी)
आता युपीआय व्यवहारांसाठी जे ॲप तुम्ही वापरता त्या ॲपनाच वापरात नसलेली खाती बंद करण्याची कारवाई करायला सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मागच्या वर्षभरात तुम्ही युपीआय खातं वापरलंच नसेल तर ते कधीही बंद होऊ शकतं. (UPI Accounts)
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण, युपीआय खातं हे ग्राहकाच्या सिम कार्डला जोडलेलं असतं. आणि ग्राहकांनी फोन नंबर बदलला की, नवीन क्रमांकावर ग्राहक नवीन खातं सुरू करतात. पण, जुना क्रमांक तसाच पडून राहतो. सुरक्षेच्या दृष्टीने हे अयोग्य आहेच. शिवाय तुमचा जुना क्रमांक जर दुसऱ्या कुणाला फोन कंपनीने दिला, तर त्या ग्राहकाला युपीआय नोंदणी करणं कठीण जातं. कारण, एका क्रमांकावर एकच युपीआय ॲप सुरू करता येतं. (UPI Accounts)
(हेही वाचा – Ashish Shelar : उद्धव ठाकरे यांचा राम मंदिराशी संबंधच काय?; ॲड. आशिष शेलार यांचा सवाल)
या मुख्य कारणासाठी पेमेंट्स कॉर्पोरेशनने वापरात नसलेली युपीआय खाती बंद करायला ॲपना सांगितलं आहे. (UPI Accounts)
आधी सांगितल्याप्रमाणे युपीआय सेवा पुरवणाऱ्या गुगलपे, फोन पे सारख्या ॲपनी अशी खाती बंद करायची आहेत. त्यासाठी या ॲपना वापरात नसलेली खाती ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शोधून काढायची आहेत. आणि त्यानंतर अशा ग्राहकांचे युपीआय आयडी आणि युपीआय क्रमांक बंद करण्यात येतील. त्याचबरोबर या खात्यांशी जोडले गेलेले मोबाईल क्रमांक युपीआय मॅपवरून काढून टाकण्यात येतील आणि या खात्यांची ॲपवरील नोंदणीही रद्द होईल. (UPI Accounts)
अर्थात, ग्राहकांना जुन्याच मोबाईल फोनवरून पुन्हा युपीआय खातं सुरू करायचं झाल्यास नवीन नोंदणी करून पुन्हा खातं सुरू करणं शक्य आहे. (UPI Accounts)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community