श्रीलाल शुक्ल (Shrilal Shukla) हे हिंदीमधील सुप्रसिद्ध आणि प्रमुख साहित्यिकांपैकी एक आहेत. त्यांच्या लिखाणाची शैली अत्यंत वेगळी आणि स्वतंत्र होती. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजातील घसरत चाललेली नैतिक मूल्ये शुक्ल यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून अधोरेखित केली आहेत. त्यांच्या लेखनातून ग्रामीण आणि शहरी भारतातील जीवनातील नकारात्मक पैलू व्यंगात्मक पद्धतीने समोर येतात.
दुःखाकडे किंवा चुकीच्या अथवा नकारात्मक गोष्टींकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अलैकिक होती. राग दरबारी ही त्यांची सर्वोत्कृष्ट रचना मानली जाते. हे पुस्तक इंग्रजी आणि इतर १५ भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. १९८० च्या दशकात यावर आधारित एक दूरदर्शन मालिका अनेक महिने सुरु होती. ‘हिंदुस्तान’ या साप्ताहिक मासिकात त्यांनी ‘आदमी का जहर’ नावाची गुप्तहेर कादंबरीही लिहिली.
शुक्ल (Shrilal Shukla) यांचा जन्म ३१ डिसेंबर १९२५ रोजी झाला. त्यांनी उत्तर प्रदेश राज्य सरकारसाठी पीसीएस अधिकारी म्हणून काम केले होते. नंतर आयएएसमध्ये सामील झाले. त्यांनी राग दरबारी, मकान, सूनी घाटी का सूरज, पहला पडाव आणि बिस्रामपूर का संत यासह २५ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
शुक्ल (Shrilal Shukla) यांना त्यांच्या सर्वोत्तम साहित्य निर्मितीसाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. १९६९ मध्ये त्यांच्या राग दरबारी या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. बिस्रामपूर का संत या कादंबरीसाठी त्यांना १९९९ मध्ये व्यास सन्मान पुरस्कार मिळाला. शुक्ला यांना २०११ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे २००८ मध्ये पद्मभूषण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
Join Our WhatsApp Community