Siddhivinayak Temple : नवीन वर्षाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनाने करायची आहे; जाणून घ्या काय आहे मुखदर्शनाची वेळ

नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने व्हावी ही अनेक भाविकांची इच्छा असते. पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात . यासाठी गर्दीचे नियोजन करण्यासाठी वेळा दिल्या आहेत.

271
Siddhivinayak Temple : नवीन वर्षाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनाने करायची आहे; जाणून घ्या काय आहे मुखदर्शनाची वेळ

नवीन वर्षाची (New Year) सुरुवात श्रीगणेशाच्या दर्शनाने व्हावे यासाठी भाविक प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या चरणी दाखल होण्याची इच्छा असते. दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या दिवशी या मंदिरात रांगा लागलेल्या असतात. सर्वांनाच नीट दर्शन घेता यावे यासाठी मंदिराच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. (Siddhivinayak Temple)

दर्शन घेण्यासाठी अपंग, ज्येष्ठ, गरोदर स्त्रियांसह महिलांची आणि मुखदर्शनाच्या रांगेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासकडून देण्यात आली आहे. (Siddhivinayak Temple)

अशी असेल व्यवस्था
अपंग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या रांगेची सुरुवात कोहिनुर हॉटेल समोरील साने गुरुजी गार्डन गेट येथून होईल.

मुखदर्शनाच्या रांगेची सुरुवात
एस.के. बोले मार्ग, आगर बाझार येथून सुरू होईल. दरम्यान, रात्री ११ वाजता दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात येतील, असे मंदिराकडून सांगण्यात आले.

(हेही वाचा : Michael Schumacher : दिग्गज फॉर्म्युला वन ड्रायव्हर मायकेल शुमाकर सध्या काय करतो?)

असे आहे दिवसभराचे नियोजन 
दर्शन – पहाटे ३:१५ ते पहाटे ५:१५ आरती – पहाटे ५:३० ते पहाटे ६
दर्शन – सकाळी ६ ते दुपारी ११:५५ नैवेद्य – दुपारी १२:५ ते दुपारी १२:३०
दर्शन – दुपारी १२:३० ते सायंकाळी ७ धुपारती – सायंकाळी ७ ते सायंकाळी ७:१०
आरती – सायंकाळी ७:३० ते रात्री ८ दर्शन – रात्री ८ ते रात्री ११
शेजारती – रात्री ११:३०

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.