Mann Ki Baat : नवीन वर्षातही आपल्याला उत्साह आणि वेग कायम ठेवायचा आहे – पंतप्रधान मोदी

'मन की बात "मध्ये देशाच्या कामगिरीमुळे मिळालेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान मोदींनी आभार मानले. तसेच या वर्षात देशातील खेळाडू आणि कलाकारांनी केलेल्या कामगिरीचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.

222
PM Narendra Modi यांनी मन की बात कार्यक्रमासाठी मागवल्या सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३१ डिसेंबर) आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ (Mann Ki Baat) च्या १०८ व्या भागात देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की जपमाळच्या एकशे आठ मण्यांप्रमाणेच’मन की बात’चा हा भाग माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.

भारत आत्मविश्वासाने भरलेला देश –

“भारत आत्मविश्वासाने भरलेला देश आहे. ही ‘विकसित भारताची’ भावना आहे. तिथे स्वावलंबनाची भावना आहे. आपल्याला २०२४ मध्ये देखील हाच उत्साह आणि गती कायम ठेवावी लागेल.’ (Mann Ki Baat)

(हेही वाचा – PM Narendra Modi अचानक एका गरीब कुटुंबाच्या घरात गेले, चहा प्यायले आणि गप्पा मारत बसले)

भारताची क्षमता खूप प्रभावी आहे –

गेल्या वर्षी देशातील खेळाडू आणि कलाकारांनी केलेल्या कामगिरीचाही मोदींनी (Mann Ki Baat) उल्लेख केला. ते म्हणाले की, “भारताची क्षमता खूप प्रभावी आहे आणि आपल्याला या लोकांकडून प्रेरणा घेऊन पुढे जायचे आहे. भारत ‘नवोन्मेषाचे केंद्र’ बनणे हे एक प्रतीक आहे जे आपण थांबविणार नाही.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : ‘बाबरी पाडली तेव्हा शिवसेनेचं कोणीही नव्हतं’)

शारीरिक आरोग्य आणि तंदुरुस्तीवर भरपूर चर्चा –

या वर्षाच्या शेवटच्या भागात (Mann Ki Baat) पंतप्रधान मोदी यांनी भरड धान्याचे फायदे अधोरेखित करताना फिट इंडिया मिशनबद्दल भाष्य केले. पंतप्रधानांनी सद्गुरु जग्गी वासुदेव, हरमनप्रीत कौर, विश्वनाथन आनंद आणि अक्षय कुमार यांचे ऑडिओ संदेशही वाजवले. “मित्रांनो, आज शारीरिक आरोग्य आणि तंदुरुस्तीबद्दल खूप चर्चा होत आहे, परंतु त्याच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मानसिक आरोग्य. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, फिट इंडियाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने नाविन्यपूर्ण आरोग्य सेवा स्टार्टअप्सबद्दल मला माहिती द्या, असे आवाहन देखील पंतप्रधान मोदींनी केले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांच्या महत्त्वावर भाष्य –

कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने (Mann Ki Baat) समाजाच्या विविध क्षेत्रांना कशा प्रकारे सुविधा पुरविल्या यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. त्यांनी काशी-तामिळ संगमम कार्यक्रमाची आठवण करून दिली, जिथे स्वदेशी एआय-संचालित भाषिनी अॅपने त्यांच्या शब्दांचा हिंदीमधून तामिळमध्ये सहजपणे योग्य अनुवाद केला. ते म्हणाले की, अशा तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीनंतर न्यायपालिका आणि शिक्षणासह विविध क्षेत्रांमध्ये काम करणे सोपे होईल. “मी युवकांना रिअल-टाइम भाषांतराशी संबंधित एआय साधनांचा शोध घेण्याचे आणि ते १०० टक्के अचूक बनवण्याचे आवाहन (Mann Ki Baat) करतो.”

(हेही वाचा – Ration Shopkeeper Strike : राज्यभरातील रेशन दुकानदारांचा १ जानेवारीपासून बेमुदत संप)

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी मिळालेल्या प्रतिसादाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Mann Ki Baat) यांनी कौतुक केले. २२ जानेवारी रोजी भगवान रामाच्या प्रतिष्ठापनासाठी कविता, गद्य आणि इतर सर्जनशील घटकांचे किती योगदान दिले जात आहे हे त्यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.