PM Modi New Year Wishlist : नवीन वर्षांतील इच्छांची यादी काय आहे; पंतप्रधान मोदींनी दिले ‘हे’ उत्तर

PM Modi New Year Wishlist : मी इच्छांच्या यादीवर (विश लिस्ट) विश्वास ठेवणारा व्यक्ती नाही. मी कामांच्या यादीला अधिक महत्त्व देणारा व्यक्ती आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

223
PM Modi New Year Wishlist : नवीन वर्षांतील इच्छांची यादी काय आहे; पंतप्रधान मोदींनी दिले 'हे' उत्तर
PM Modi New Year Wishlist : नवीन वर्षांतील इच्छांची यादी काय आहे; पंतप्रधान मोदींनी दिले 'हे' उत्तर

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण नवनवीन संकल्प करतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या विश लिस्ट विषयी सांगितले आहे. (PM Modi New Year Wishlist)

मी २२ वर्षांपासून महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहे. या वेळी ‘राष्ट्र प्रथम’ हीच भूमिका नजरेसमोर ठेवून काम केले. मी इच्छांच्या यादीवर (Wishlist) विश्वास ठेवणारा व्यक्ती नाही. मी कामांच्या यादीला अधिक महत्त्व देणारा व्यक्ती आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ‘इंडिया टुडे’ (India Today) या वृत्तवाहिनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुलाखत दिली. त्या वेळी ते बोलत होते.

(हेही वाचा – Corona : राज्यात कोरोनाचे नवे १७२ रुग्ण; मुंबईत ३२ नवे रुग्ण)

मी नेहमीच देशाला प्रथम महत्त्व दिले

या वेळी पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राजकारणातील अनेक प्रश्नांसंबधी आपली भूमिका मांडली. २२ वर्षांच्या कारकीर्दीच्या यशाचे रहस्यही त्यांनी सांगितले. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी सार्वजनिक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत आलो. जे यश मिळाले, ते सर्वांसमोर आहेच. त्यामुळे त्यातून यशाचा मंत्र काढू शकता. एक गोष्ट मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत पाळली आहे, ती म्हणजे ‘राष्ट्र प्रथम’ (Nation first) ही भावना.”

”एक कार्यकर्ता, मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान असतानाही मी नेहमीच देशाला प्रथम महत्त्व दिले. मी घेतलेला प्रत्येक निर्णय हा राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून घेतला. मला अनेकदा लोक विचारतात की इतके कठीण निर्णय मी कसे काय घेतो. पण मला यात काही कठीण वाटत नाही, कारण मी राष्ट्र प्रथम (Nation first) या भूमिकेतूनच विचार करत असतो. त्यामुळे तसे निर्णय घेणे सोपे जाते”, असे ते म्हणाले.

(हेही वाचा – Ration Shopkeeper Strike : राज्यभरातील रेशन दुकानदारांचा १ जानेवारीपासून बेमुदत संप)

माझे काम पूर्ण झाल्यावर लोकांना समजेल

वर्ष २०२३ मधील कामगिरीविषयीच्या भावनाही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. ”माझ्या एका वर्षाच्या प्रवासाचे जर मूल्यमापन केले, तर कदाचित स्पष्ट चित्र दिसणार नाही. जेव्हा मी काहीतरी सुरू करतो, तेव्हा मला त्याचा अंतिम बिंदू माहीत असतो. सुरुवातीलाच मी त्याबद्दल भाष्य करत नाही किंवा त्यासंबंधीची ब्लू प्रिंटही जाहीर करत नाही. माझे काम एखाद्या चित्रकाराप्रमाणे असते. मी एका बिंदूपासून कामाला सुरुवात करतो. चित्र पूर्ण झाल्यनंतरच एखादे काम दिसते. माझ्या बाबतीतही असेच आहे. काम पूर्ण झाल्यानंतर ते लोकांना समजते”, अशा प्रकारे वर्ष २०२३ मध्ये केलेल्या कामाविषयी पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले. (PM Modi New Year Wishlist)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.