छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या (Waluj Fire Disaster) दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत –
मध्यरात्री लागलेल्या या आगीत (Waluj Fire Disaster) सहा कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
(हेही वाचा – ISRO: नवीन वर्षात इस्रो करणार ‘कृष्णविवरां’चा अभ्यास, ‘PSLV-C58’ध्रृवीय उपग्रहाचे सोमवारी प्रक्षेपण)
याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आग शमविण्यासाठी (Waluj Fire Disaster) तसेच अडकलेल्यांना सुखरूप काढण्यासाठी करण्यात आलेल्या बचाव कार्याची माहितीही त्यांनी घेतली व हे मदत कार्य व्यवस्थित पार पडण्यास सांगितले.
नेमकी घटना काय ?
छत्रपती संभाजीनगरच्या (Chatrapati Sambhajinagar) वाळूज(waluj) औद्योगिक वसाहतीत शनिवारी (३० डिसेंबर) मध्यरात्री भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. सनशाईन एंटरप्राईज या हँडग्लव्ह बनवणाऱ्या कंपनी मध्ये ही घटना घडली. या कंपनीमध्ये झोपेत असतानाच ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.
(हेही वाचा – Thane – Drugs Seized : ठाण्यात वडवली खाडी किनारी झिंगाट, पोलिसांनी उतरवली नशा, ९५ जणांसह ८ लाखांचा अमली पदार्थ जप्त)
तर कंपनीतील चार कामगारांनी बाहेर पडून आपला कसाबसा जीव वाचवला आहे. ही आग कशामुळे लागली हे अदयाप समजू शकले नाही.
पहाटे चार वाजेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु –
या कंपनीमध्ये जवळपास २० ते २५ कामगार काम करतात. या दुघटनेत ६ कामगारांचा जळून मृत्यू झाला. दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. पहाटे चार वाजेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते, त्यानंतर आग विझवण्यात यश आलं. हे सर्व कामगार हे बिहारचे रहिवासी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community