Israel-Hamas Conflict: इस्रायल हमासमधील ओलिस ठेवलेल्या ५० नागरिकांची सुटका करणार, कॅबिनेट वॉर मिटिंगमध्ये निर्णय

बंदींच्या सुटकेबाबत चर्चा करण्यास इस्रायलच्या मोसाद गुप्तचर संस्थेचे प्रमुख डेव्हिड बर्नाय यांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

253
Israel-Hamas Conflict: इस्रायल हमासमधील ओलिस ठेवलेल्या ५० नागरिकांची सुटका करणार, कॅबिनेट वॉर मिटिंगमध्ये निर्णय
Israel-Hamas Conflict: इस्रायल हमासमधील ओलिस ठेवलेल्या ५० नागरिकांची सुटका करणार, कॅबिनेट वॉर मिटिंगमध्ये निर्णय

इस्रायलने ओलीस ठेवलेल्या (Israel-Hamas Conflict) नागरिकांची सुटका न केल्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांच्या प्रती निषेध व्यक्त केला जात आहे. ओलिस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी त्यांचे पीडित कुटुंबिय आंदोलन करत आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष आणि अनेक संघटनांनीही नेत्यनाहू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, मात्र ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नेत्यनाहू यांनी नुकतीच इस्रायलच्या कॅबिनेट वॉर मिटिंगमध्ये दिली आहे.

इस्त्रायलच्या कॅबिनेट वॉर मिटिंगमध्ये हमासच्या ओलिस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्याचा निर्णय प्राधान्यक्रमाने घेण्यात आला आहे. याबाबत इस्रायल संरक्षण मंत्रालयाकडून ओलिस ठेवलेल्या नागरिकांच्या सुटकेबाबत कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांशी पुढील चर्चा करण्यासाठी युद्ध मंत्रिमंडळाची रविवारी बैठक झाली. याबाबत इस्रायली संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे. बंदींच्या सुटकेबाबत चर्चा करण्यास इस्रायलच्या मोसाद गुप्तचर संस्थेचे प्रमुख डेव्हिड बर्नाय यांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या इस्रायली वॉर कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या या महत्त्वाच्या बैठकीनंतर, इस्रायल लवकरच ७ ऑक्टोबरपासून गाझामध्ये असलेल्या हमासच्या बंदिवासातून सुमारे ५० ओलिसांची सुटका करण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Tehreek-e-Hurriyat Banned : जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामिक राजवट लादण्याचा कट; तहरीक-ए-हुर्रियतवर बंदी )

मोसादचा प्रमुख बर्नियरने अलीकडेच पोलंडमध्ये सी. आय. ए. चे प्रमुख विल्यम बर्न्स, कतारचे पंतप्रधान अब्दुलरहमान बिन जसीम अल-थानी आणि बंधकांच्या सुटकेबाबत इजिप्तच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेली चर्चा अयशस्वी ठरली, कारण हमासने चर्चेतून माघार घेतली आणि युद्ध पूर्णपणे संपवण्याचा आग्रह धरला. हमासची ही अट इस्रायलने नाकारली.

हमासच्या अटी स्वीकारणार नाही...

इस्रायल संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हमास वाटाघाटी करण्याकरिता परत आला आहे. हमास आणि इस्रायल दोघेही चर्चेसाठी परतल्यानंतर गाझामध्ये युद्धविराम आणि ओलिसांची सुटका होऊ शकते. रविवारी झालेल्या बैठकीत हमाससोबत संवाद वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. ओलिसांच्या सुटकेबाबत हमासने करारात ज्या अटी घातल्या आहेत त्या स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत, असेही बेंजामिन नेत्यनाहून यांनी शनिवारी सांगितले होते. यावेळी ‘आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू, पण हमासच्या अटी स्वीकारणार नाही’, असे ते म्हणाले.

(हेही वाचा – ISRO: नवीन वर्षात इस्रो करणार ‘कृष्णविवरां’चा अभ्यास, ‘PSLV-C58’ध्रृवीय उपग्रहाचे सोमवारी प्रक्षेपण )

हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केला, ज्यात सुमारे १,२०० लोक मारले गेले आणि किमान २४० लोकांना ओलीस ठेवले. त्यावेळी इस्रायलनेही गाझा पट्टीवर प्रत्युत्तरादाखल हल्ला केला. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दोन्ही बाजूंनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली. युद्धबंदी कराराअंतर्गत इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आणि हमासने इस्रायली बंधकांची सुटका केली. सात दिवसांच्या विरामानंतर, युद्ध पुन्हा सुरू झाले, जे अजूनही सुरू आहे. अहवालांनुसार, हमासने अजूनही ५० ते १०० इस्रायली लोकांना ओलीस ठेवले आहे. दोन्ही बाजू इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थीने युद्धबंदी आणि बंदकांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.