अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर (Ram Mandir) उभारण्यात आले आहे. २२ जानेवारीला राम लल्लाच्या मंदिरात अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा केला जाणार आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त अयोध्येत पोहोचू लागले आहेत. यासाठी भगवान श्री रामाचे तीन भक्त बुलंदशहरहून अयोध्येला पोहोचले आहेत. शनिवारी रात्री तिघेही हरदोईपर्यंत आले असून येथे रात्र घालवल्यानंतर ते सकाळी अयोध्येत रवाना होतील.
बुलंदशहरच्या शेखपूर गर्वा येथील रहिवासी मनीष, दुष्यंत आणि विजय हे १५ डिसेंबरला गाव सोडून अयोध्येला गेले होते. मनीषने सांगितले की, हे तिघे बालपणीचे मित्र आहेत. जेव्हा श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख निश्चित झाली, तेव्हा लगेच मनात भावना जागृत झाली की, त्यांनाही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला मिळेल का? तेव्हा त्यांनी एकमेकांना विचारून अयोध्येला जायचे ठरवले. दुष्यंत आणि विजयही अयोध्येला जाण्याकरिता तयार झाले, पण अयोध्येपर्यंत पोहोचायचे कसे, हा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर तिघांनीही विचार करून दंडवत यात्रेत सहभागी व्हायचा निर्णय घेतला.
(हेही वाचा – Property in Mumbai : मुंबईचा अनोखा विक्रम; वर्षभरात तब्बल १ लाख २७ हजार १३९ मालमत्तांची विक्री)
अयोध्येला जाण्यासाठी नोकरी सोडली…
याविषयी मनीषने सांगितले की, दंडवत यात्रेकरिता ६०० किलोमीटर दूर पायी प्रवास करावा लागणार होता आणि त्याकरिता बरेच दिवस लागण्याची शक्यता होती. दुष्यंत आणि विजय आयटीआयचे विद्यार्थी आहेत. त्यांना प्रवासाबाबत कोणतीही अडचण नसली, तरीही मनीष एका खासगी कंपनीत काम करत होता. त्यामुळे प्रवासासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याने त्याला सुट्टी हवी होती. त्यामुळे मनीषने अयोध्येला जाण्याकरिता कंपनीतील अधिकाऱ्यांकडे एक महिन्याची सुट्टी मागितली. अधिकाऱ्यांनी सुट्टी देण्यास नकार दिला. सुट्टी न मिळाल्याने मनीष निराश झाला. त्याने सांगितले की, तो जेव्हा ६ वर्षांचा होता, तेव्हा त्याचे वडील गेले. मनीषला ५ भाऊ आणि २ बहिणी आहेत. कुटुंबात, त्याचा मोठा भाऊ पीठ गिरणीत काम करतो. त्यांच्याकडे असलेल्या एका म्हशीला त्याची आई सांभाळते. त्यांचे कुटुंब दरमहा १५,००० रुपये कमावते. अशा परिस्थितीतही त्याने अयोध्येला जाण्याकरिता नोकरी सोडण्याची मनाची तयारी केली. त्याने ही गोष्ट कुटुंबियांना सांगितली तेव्हा तेही नाराज झाले. त्यांनी मनीषच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाला विरोध केला. त्याच्या आईने त्याला सांगितले की, ‘तू राम लल्लाच्या दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला आहेसच, तर नोकरीची चिंता अजिबात करू नकोस. सगळ्यांचे दु:ख दूर करणारे प्रभु श्री रामच तुला यातून मार्ग दाखवतील.’ त्यानंतर मनीषने नोकरी सोडली.
अयोध्येला जाण्याकरिता पायी प्रवास सुरू
१५ डिसेंबरला मनीष, दुष्यंत आणि विजयने अयोध्येला जाण्याकरिता पायी प्रवास सुरू केला. त्याने जुन्या दुचाकीत काही बदल करून रथ तयार केला. त्याच्या चारही बाजूंना भगवान श्रीरामाचे चित्र असलेले फ्लेक्स लावले. काही खाद्यपदार्थ सोबत घेतले. त्याच्या शेजाऱ्यांनीही त्याला आर्थिक मदत केली. वाटेत त्यांना घनदाट जंगलातूनही जावे लागले, परंतु तेथेही त्यांची काही रामभक्तांची भेट झाली. त्यांनी त्याला खूपच मदत केली. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. त्याने हरदोईपर्यंत ३०० किलोमीटरचा प्रवास १५ दिवसांत पूर्ण झाला असून १५ जानेवारीला ते अयोध्येला पोहोचेन आणि तेथील कार्यक्रमांमध्ये सहभागी होईन, अशी माहिती मनीषने दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community