मणिपूरच्या सीमेजवळील मोरेह येथे अतिरेक्यांनी रात्री पोलीस बॅरेकवर (Militants Attack) हल्ला केला. शनिवारी रात्री सुमारे अर्धा तास ही चकमक सुरु होती. यामध्ये सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी रॉकेट कंट्रोल ग्रेनेड (RPG) देखील डागण्यात आले. यात चार कमांडो जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी एकाच दिवसात दोनदा हल्ले केले. आधी इम्फाळ-मोरेह महामार्गावर प्रवास करणार्या मणिपूर कमांडोच्या एका युनिटवर दिवसा हल्ला करण्यात आला. त्यानंतर काही तासांनी पोलीस बॅरेकवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. शनिवारी दुपारी 3.45 च्या सुमारास ताफ्यावर जोरदार गोळीबार झाल्याने एक कमांडो जखमी झाला. यानंतर मध्यरात्री पोलिसांच्या दुचाकीवर दुसरा मोठा हल्ला झाला ज्यामध्ये रॉकेट लाँचरचा वापर करण्यात आला.
(हेही वाचा – Ram Mandir: 600 किलोमीटर दंडावत यात्रेतून 3 भाविक अयोध्येत दाखल, रोमांचकारी प्रवास वर्णन वाचून आश्चर्यचकित व्हाल ! )
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र मध्यरात्री बॅरेकमध्ये झोपलेल्या कमांडोंवर हल्ला करण्यासाठी आरपीजी डागण्यात आले. यामध्ये चार कमांडो जखमी झाले. बॉम्बस्फोटामुळे एका कमांडोच्या कानाला दुखापत झाली आहे. यापुढे हे हल्ले अतिरेक्यांनी डोंगरात लपून हल्ले केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमी कमांडोंना आसाम रायफल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आसाम रायफल्सचे उच्च अधिकारी हिंदुस्थान-म्यानमार सीमेजवळील सीमावर्ती मोरेहला रवाना झाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community