Chief Secretary Maharashtra : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर; पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता कार्यभार सांभाळणार विवेक फणसळकर

Chief Secretary Maharashtra : प्रशासनाचे प्रमुख मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यानंतर नितीन करीर यांना मुख्य सचिवपद देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागात काम केल्याचा त्यांना अनुभव आहे.

636
Chief Secretary Maharashtra : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर; पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता कारभार सांभाळणार विवेक फणसळकर
Chief Secretary Maharashtra : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर; पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता कारभार सांभाळणार विवेक फणसळकर

पोलीस महासंचालक (Director General of Police) रजनीश शेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. ते रविवार, ३१ डिसेंबर रोजी निवृत्त झाले आहेत. त्यानंतर पोलीस महासंचालक (DGP) पदाचा तात्पुरता कारभार विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. (Chief Secretary Maharashtra)

सेवा ज्येष्ठतेनुसार रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे; पण त्या या पदासाठी इच्छूक नसल्याचे समजते. त्या मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) पदासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचा – GOOGLE-DOODLE: नववर्षाच्या स्वागतासाठी गुगलने तयार केले खास ‘डूडल’; आकर्षक रंगसंगती, वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे)

एप्रिलपासून सुरु होती चर्चा 

प्रशासनाचे प्रमुख मुख्य सचिव मनोज सौनिक (Manoj Saunik) यांच्यानंतर नितीन करीर (Nitin Karir) यांना मुख्य सचिवपद (Chief Secretary Maharashtra) देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागात काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. २८ एप्रिलला राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव निवृत्त झाल्यानंतरच नितीन करीर (Nitin Karir) यांच्या नावाची चर्चा चालू होती.

१९८८ च्या बॅचचे IAS असलेले नितीन करीर हे सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. थोड्याच वेळात ते सीएस मनोज सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

(हेही वाचा – Israel-Hamas Conflict: इस्रायल हमासमधील ओलिस ठेवलेल्या ५० नागरिकांची सुटका करणार, कॅबिनेट वॉर मिटिंगमध्ये निर्णय)

मे २०२३ मध्ये महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेले डॉ. नितीन करीर यांची मंत्रालयात वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यापूर्वी ब्रिजेश दीक्षित सेवानिवृत्त झाल्यानंतर महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार नितीन करीर (Nitin Karir) यांच्याकडे देण्यात आला होता. (Chief Secretary Maharashtra)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.