Millet: भरडधान्यांचे आरोग्यदायी महत्त्व !

260
Millet: भरडधान्यांचे आरोग्यदायी महत्त्व !
Millet: भरडधान्यांचे आरोग्यदायी महत्त्व !

भरडधान्य अर्थात श्रीअन्न ! (Millet) उसळ किंवा उखळीखाली भरडल्यामुळे ज्या धान्यावरची साल निघाली आहे, असे धान्य ! गेल्या वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांत भरडधान्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’ कार्यक्रमातून भरडधान्याचे महत्त्व सांगितले आहे. यानिमित्त ‘भरडक्रांती’ची बीजे कशी रोवली गेली आहेत. त्याचा घेतलेला हा मागोवा –

आपल्या देशात पारंपरिक पद्धतीने भरडधान्य पिकांची मुख्य अन्नधान्य पीक म्हणून लागवड केली जाते. या पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जव या भरडधान्याबरोबर ज्यांची कधी आपण नावेही ऐकलेली नाहीत, अशा भरडधान्यांचीही लागवड केली जाते. अशी भरडधान्ये म्हणजे कुटकी, कोडो,कोद्रा, बर्टी, राळा, कांगणी आणि सावा ! ज्वारी आणि बाजरी ही साधारणतः आकाराने मोठी असलेली धान्ये असून त्यांना ‘ग्रेटर मिलेट’ म्हणतात. तर आकाराने बारीक असलेली नाचणी, वरी, राळा, कोदो, बर्टी, प्रोसो व ब्राऊनटौप ही सर्व ‘मायनर मिलेट’ किंवा ‘बारीक धान्ये’ म्हणून ओळखली जातात.भारतातून संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, सौदी अरेबिया, लिबिया, ओमान, इजिप्त, ट्युनिशिया, येमेन, यु.के. आणि अमेरिका या प्रमुख देशांमध्ये भरड धान्ये निर्यात होतात. यात बाजरी, नाचणी, कांगणी, राळे, वरी, राजगिरा ज्वारी आणि कुट्टू (बकव्हीट) हे भारतामधून निर्यात होणाऱ्या भरड धान्यांचे विविध प्रकार आहेत.तर इंडोनेशिया, बेल्जियम, जपान, जर्मनी, मेक्सिको, इटली, यू.एस.ए., युनायटेड किंग्डम, ब्राझील आणि नेदरलँड्स हे प्रमुख देश इतर विविध देशातून भरड धान्ये आयात करतात.

(हेही वाचा – Nitesh Rane: नितेश राणेंचा कोकणातील पाणबुडी प्रकल्पावरून हल्लाबोल, विरोधक कोणतीही माहिती न घेता भुंकत असल्याची टीका)

आधुनिक जीवनशैलीमध्ये शारीरिक श्रम कमी असले, तरी सतत संगणकासमोर बसून काम करणाऱ्या बैठ्या कामामुळे मधुमेह, ह्रदयविकार, पचनसंस्थेसंबंधित आजार, कर्करोग…अशा आरोग्यविषयक समस्या हल्ली तरुण वयातच निर्माण होतात. भरडधान्याचा आहारात नियमित समावेश केल्यास हे सर्व आजार होण्याचा धोका कमी असतो, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. भरडधान्य पिकांमध्ये असलेल्या पौष्टिक गुणधर्मामुळे शरीर सुदृढ होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते.

भरडधान्याचे महत्त्व
– अनेक पौष्टिक गुणधर्म आणि मुबलक प्रमाणात प्रथिने, खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे भरडधान्यांत असतात.
-आजच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यासाठी फायदेशीर आणि ही महत्त्वाची अन्नधान्य पिके आहेत.
-नियमित आहार आणि पौष्टिक अन्न म्हणून भरडधान्यांचा रोजच्या आहारात समावेश करता येईल.
-बदलत्या जीवनशैलीनुसार आता भरडधान्याचे महत्त्व लोकांन पटले आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे.
– भरडधान्य पिकांचे शेतकऱ्यांसाठी, सामान्य लोकांसाठी आणि पर्यावरणासाठी भविष्यात खूप महत्त्व आहे.

पौष्टिक गुणधर्म
– भरडधान्यात मुबलक जीवनसत्त्वे असतात. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. राळा या भरडधान्यात प्रथिने, तर बाजरीमध्ये लोह जास्त असतात. भरडधान्यात तंतुमय पदार्थ तांदळाच्या तुलनेत जास्त असतात. राळामध्ये थायमिनचे प्रमाण जास्त असते. फॉलिक अॅसिडचे प्रमाण ज्वारी आणि कोडोमध्ये जास्त असते.

ह्रदयविकार
भरडधान्य पिकांमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम या खनिजाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तदाब कमी किंवा नियंत्रणात राहण्यास मदत होते.पचनविकार दूर होतात. तंतुमय पदार्थांचे प्रमाण भरडधान्यात जास्त असल्याने रक्तातील कोलेस्टेरॉल कमी किंवा नियंत्रित राहण्यास मदत होते.

मधुमेह
शरीरातील इन्सुलीनचे प्रमाण कमी झाले की मधुमेह होतो. सध्या हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने हे घटक भरडधान्यात मुबलक प्रमाणात असतात. मॅग्नेशियम या खनिजामुळे इन्सुलिन या संप्रेरकाची कार्यक्षमता वाढते. भरडधान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने भरडधान्याचा आहारात समावेश केल्यास मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.

पचनाशी निगडीत समस्या
भरडधान्य सेवन केल्याने पचनक्रिया सुलभ होते.शरीरासाठी आवश्यक पोषक तत्त्वे, खनिजांचा शरीराला फायदा होतो. त्यामुळे पचनविकार,मूळव्याध यासारखे आजार टाळण्यास मदत होते. तंतुमय पदार्थांमुळे बद्धकोष्ठता, पोटातील वात, मूळव्याध यासारखे आजार होत नाहीत.

  • भारतीय भरड धान्ये संशोधन संस्था
     भारतीय कृषी संशोधन

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.