आपल्या देशात अनेक मोठी माणसे होऊन गेली. बर्याचदा आपल्याला त्यांची नावे देखील माहीत नसतात. त्यांच्या कार्याला म्हणावा तसा प्रतिसादही मिळालेला नसतो. पण ती माणसं काय मोठी नसतात का ? त्यांपैकी एक म्हणजे सत्येंद्र नाथ बोस (Satyendra Nath Bose) ! त्यांनी १९२० च्या दशकात क्वांटम फिजिक्समधील संशोधन करून जगाचे लक्ष वेधून घेतले होते. सत्येंद्र नाथ बोस हे भारतातील असे महान शास्त्रज्ञ होते, ज्यांच्या क्वांटम सिद्धांताने प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन प्रभावित झाले होते.
(हेही वाचा – Nitesh Rane: नितेश राणेंचा कोकणातील पाणबुडी प्रकल्पावरून हल्लाबोल, विरोधक कोणतीही माहिती न घेता भुंकत असल्याची टीका)
सत्येंद्र नाथ बोस यांची शैक्षणिक पार्श्वभूमी
सत्येंद्र नाथ बोस (Satyendra Nath Bose) यांचा जन्म १ जानेवारी १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ बोस ‘ईस्ट इंडियन रेल्वे कंपनी’च्या (East Indian Railway Company) अभियांत्रिकी विभागात काम करत होते. त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून इंटरमिडिएट केले. यानंतर त्यांनी १९१५ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमधून ‘अप्लाईड मॅथ्स’मध्ये एमएससी पूर्ण केली. त्याचबरोबर १९१६ मध्ये कोलकाता विद्यापिठाच्या ‘सायन्स कॉलेज’मध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून प्रवेश घेतला आणि सापेक्षता सिद्धांताचा अभ्यास सुरू केला.
बोस एक अद्भुत व्यक्तिमत्व होते. इंटरमिडिएटच्या परीक्षेत त्यांना १०० पैकी ११० गुण मिळाले. हा रेकॉर्डच म्हणावा लागेल. त्यांनी लावलेला शोध देखील अद्भुत होता. जोपर्यंत शास्त्रज्ञांना केवळ अणूंबद्दल माहिती होती, तोपर्यंत मॅक्सवेल-वोल्टझमन यांचे नियम खरे मानले जात होते. अणूमध्ये अनेक अणु कण आहेत आणि त्यांची हालचाल अद्वितीय आहे, हे बोस यांनी शोधून काढले, जे पुढे बोस-आईन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स (Bose-Einstein Statistics) म्हणून ओळखले जाऊ लागले.
(हेही वाचा – Militants Attack: मणिपूरच्या सीमेजवळ पोलीस बॅरेकवर अतिरेक्यांचा हल्ला, ४ कमांडो जखमी)
बोस यांच्या शोधाला मिळाले ‘बोसॉन’ हे नाव
झालं असं की, बोस यांनी १९२४ मध्ये ‘प्लांक्स लॉ अँड लाइट क्वांटम’ (Planck’s Law and Light Quantum) नावाचा शोधनिबंध लिहिला. भारत हा पारतंत्र्यात होता; म्हणून बोस यांच्या या लेखाला कोणत्याही मासिकात स्थान देण्यात आले नाही. मग त्यांनी आपला शोधनिबंध अल्बर्ट आइनस्टाईन (Albert Einstein) यांना पाठवला. आईनस्टाईन ते पाहून खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्याचे जर्मन भाषेत भाषांतर करून ते एका जर्मन विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध केले. याच जर्नलमध्ये ‘बोसॉन’ (Boson) हा शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला होता. महान शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांनी बोस यांच्या शोधाला ‘बोसॉन’ हे नाव दिले. असे थोर शास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस (Satyendra Nath Bose) यांची आज जयंती…
हेही पहा –
Join Our WhatsApp Community