Corona Update: नवीन वर्षात काळजी घ्या! राज्यात JN.1 व्हेरियंट रुग्ण संख्येत वाढ; पुण्यात सर्वाधिक

ठाणे, पुणे, अकोला, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

206
Corona Update: नवीन वर्षात काळजी घ्या! राज्यात JN.1 व्हेरियंट रुग्ण संख्येत वाढ; पुण्यात सर्वाधिक
Corona Update: नवीन वर्षात काळजी घ्या! राज्यात JN.1 व्हेरियंट रुग्ण संख्येत वाढ; पुण्यात सर्वाधिक

महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1चे १९ रुग्ण आढळून आले आहेत. JN.1व्हेरियंटची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. ठाणे, पुणे, अकोला, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

JN.1 व्हेरियंट हा BA.2.86चा वंशज आहे. याला पिरोला म्हणून ओळखलं जायचं. JN.1च्या पहिल्या रुग्णाची नोंद केरळमध्ये झाली होती. एका ७९ वर्षीय महिलेला याची लागण झाली होती. त्यानंतर तो देशभरात पसरू लागला.

(हेही वाचा – Hope Nature Trust Award: ३६व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात अर्णव पटवर्धन आणि सौरभ महाजन यांचा सत्कार )

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशात कोरोनाचे ८४१ रुग्ण आढळले आहेत. ७ महिन्यांतील ही एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्राने राज्य सरकारकडे मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

काळजी कशी घ्याल…
– कोरोनाचा JN.1 व्हेरियंट घातक नसला, तरी काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
– लोकांनी मुखपट्टी वापरावी.
– नव्या वर्षानिमित्त लोकं जास्त प्रमाणात एकत्र येतात. त्यामुळे येत्या काळात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
– या पार्श्वभूमीवर जनतेने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.