राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) 2023 मध्ये केलेल्या कारवायांची आकडेवारी घोषित केली आहे. एनआयएने दहशतवादी (terrorist), गँगस्टर (Gangster), अमली पदार्थांची तस्करी (Drug trafficking), मानवी तस्करी (Human Trafficking) आणि राष्ट्रीय हिताच्या विरोधात काम करणार्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली.
(हेही वाचा – KEM Hospital : शस्त्रक्रियागृहात रिमोट अलार्मसह मेडिकल आयसोलेशन)
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एनआयएच्या संपूर्ण देशभरातील कामकाजात वाढ झाल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे. 2022 मध्ये अटक करण्यात आलेल्या 490 आरोपींच्या तुलनेत, एनआयएने या वर्षी एकूण 625 जणांना अटक केली आहे. ISIS च्या मोड्यूलचा (ISIS Module) भांडाफोड करणे, काश्मिरी आणि इतर जिहादी (Jihadi), तसेच देशात कार्यरत असलेल्या वाढते दहशतवादी नेटवर्क यांच्या विरोधात केलेली मोठी कारवाई हे वर्षभरातील NIA चे सर्वांत मोठे यश आहे.
यामध्ये ISIS च्या कारवायांमध्ये प्रकरणांमध्ये 65, जिहादी प्रकरणांमध्ये 114, मानवी तस्करी प्रकरणात 45, दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये 28, डाव्या विचारसरणीचे अतिरेकी (LWE) प्रकरणांमध्ये 76 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये दोषी ठरविण्याचे प्रमाण 94.70 टक्के होते. वर्ष 2023 मध्ये आरोपींकडून 56 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.
(हेही वाचा – Indian Navy : भारतीय नौदलाने अरबी समुद्रात वाढवली गस्त; काय आहे कारण ?)
दोषींना शिक्षा करण्याचे प्रमाण लक्षणीय
2023 मध्ये दोषी ठरलेल्या 74 आरोपींना शिक्षा म्हणून ‘सश्रम कारावास’ आणि ‘दंड’ अशा विविध शिक्षा सुनावण्यात आल्या. 94.70 टक्के आरोपींवरील दोष सिद्ध झाले आहेत.
Stupendous 94.70 % Conviction Rate, Approx 28% more Arrests, Rs.56 Cr. Worth of Assets Attached pic.twitter.com/FhRhVVt5EN
— NIA India (@NIA_India) December 31, 2023
अमली पदार्थांवर कारवाई
भारत-पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरून 102 किलोपेक्षा जास्त अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या प्रमुख फरार आरोपीला या वर्षभरात अटक झाली. हे सर्वांत मोठे यश ठरले.
(हेही वाचा – Mann Ki Baat : ‘मन कि बात’मध्ये पंतप्रधानांनी सांगितले मानसिक आरोग्याचे महत्त्व)
2023 मध्ये 1040 छापे
NIA ने शोध आणि छाप्यांमध्ये देखील मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ केली आहे. छाप्यांची संख्या 2022 मध्ये 957 होती. ती 2023 मध्ये 1040 पर्यंत वाढली आहे. देशभरातील जिहादविरोधी कारवाई NIA साठी 2023 मध्ये मैलाचा दगड ठरली. यामध्ये ISIS च्या देशभरातील मॉड्यूल्सचा पर्दाफाश झाला.
डिसेंबरमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 44 ठिकाणी छापे टाकून एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली होती, ज्यातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी साहित्यही जप्त करण्यात आले होते. अशा प्रकारे वर्षभरात एनआयएने विविध कारवायांमध्ये शेकडो आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि मोठे दहशतवादी नेटवर्क उद्धवस्त केले, असे NIAच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community