मुंबई मधील सर्वात महत्वाचे स्थानक म्हणून दादर स्थानक ओळखले जाते. ज्या स्थानकातून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या सुटतात तसेच मेल एक्स्प्रेसचे जंक्शन असल्यामुळे दादर स्थानक (Dadar Station) नेहमीच गर्दीने खचाखच भरलेले असते. त्यात फलाट क्रमांक १० वर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. यावरच तोडगा काढण्यासाठी १० आणि ११ फलाटामधील असणारे लोखंडी कुंपण आहे ते हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना ११ फलाटावरील जलद लोकल पकडणे सहज शक्य होणार आहे. अशी माहिती रेल्वेच्या आधिकाऱ्यांनी दिली आहे. (Central Railway)
फलाटावरील गर्दी कमी करण्यासाठी हा महत्वाचा उपक्रम
मुंबई विभागात फलाटावरील गर्दी कमी करण्यासाठी हा महत्वाचा उपक्रम हाती घेण्यात आले आहे. दादर स्थानकातील फलाट क्रमांक ८ चे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर फलाट क्रमांक १०/११ दुहेरी बाजूंची काम सुरू आहेत. कल्याण मध्ये फलाट क्रमांक ४/५ वरील सेवा इमारती पाडल्या आहेत. (Central Railway)
(हेही वाचा : CM Eknath Shinde : राम मंदिराच्या उभारणीने सुरु होणारे नववर्ष महाराष्ट्रासाठी सुद्धा उत्साहवर्धक)
नववर्षात मध्य रेल्वेवरील प्रवास सुसाट
ठाणे येथील फलाट क्रमांक ५/६ च्या रुंदीकरणासाठी आणि पादचारी पूल तोडण्यासाठी सज्ज आहे. तसेच फलाटावरील दुकानांचे धोरणात्मकरीत्या स्थानांतर करण्यात आले आहे. मेल/एक्स्प्रेस गाड्या इतर फलाटावर स्थलांतरित करण्यात आल्या आहेत यामुळे नववर्षात मध्य रेल्वेवरील प्रवास सुसाट होईल असे आधिकाऱ्यांनी सांगितले. तर एप्रिल पर्यंत मध्य रेल्वे मार्गावरील सर्व कामे पूर्ण होणार आहेत अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही पहा –