- ऋजुता लुकतुके
मुंबईतील एका मोठ्या बिल्डरने वेळ आणि रस्त्यावरील रहदारी टाळण्यासाठी चक्क लोकल ट्रेनने प्रवास केला. (Billionaire’s Day Out)
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी (Niranjan Hiranandani) यांनी रविवारी आपल्या ताफ्यातील सगळ्या लक्झरी गाड्या सोडून चक्क लोकलने प्रवास केला आणि तो ही थेट उल्हासनगरपर्यंत. त्यांनी स्वत; सहकाऱ्यांबरोबर केलेल्या या प्रवासाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. (Billionaire’s Day Out)
निरंजन हिरानंदानी (Niranjan Hiranandani) यांनीच या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, मुंबईच्या रस्त्यांवरील रहदारी टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी त्यांनी लोकलचा पर्याय स्वीकारला आणि या प्रवासातून त्यांना काही नवीन गोष्टीही कळल्या. (Billionaire’s Day Out)
निरंजन हिरानंदानी (Niranjan Hiranandani) यांच्याबरोबर त्यांच्या कार्यालयातील काही माणसंही होती. हिरानंदानी (Niranjan Hiranandani) या व्हिडिओत विक्रोळी स्थानकावर लोकलची वाट बघतानाही दिसतात आणि लोकल आल्यावर एसी डब्यात ते आपल्या सहकाऱ्यांबरोबर चढतात. आणि त्यानंतर बरोबरच्या सहप्रवाशांशी गप्पा मारतानाही दिसतात. (Billionaire’s Day Out)
View this post on Instagram
(हेही वाचा – Corona Update : भारतात २४ तासांत कोरोनाचे ८०० हून अधिक रुग्ण;लक्षणे सौम्य,मात्र काळजी घेण्याचे WHO चे आवाहन)
निरंजन हिरानंदानी (Niranjan Hiranandani) हे हिरानंदानी समुहाचे (Hiranandani Group) सहसंस्थापक आणि संचालकही आहेत. त्यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो जवळ जवळ ८० लाख लोकांनी पाहिला आहे आणि त्यावर प्रतिक्रियाही येत आहेत. ‘अब्जाधीश असूनही पाय जमिनीवर असलेला,’ अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. (Billionaire’s Day Out)
तर दुसऱ्या एकाने ‘उद्योजकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून असा नियमित प्रवास केला तर इतर प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा तरी वाढतील,’ अशीही प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांनी हिरानंदानी (Niranjan Hiranandani) दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास केला ही गोष्टही बोलून दाखवली आहे. (Billionaire’s Day Out)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community