Japan Earthquake : जपानमध्ये ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

एनएचके टीव्हीने पाण्याचा प्रवाह ५ मीटर (१६.५ फूट) पर्यंत पोहोचू शकतो असा इशारा दिला आणि नागरिकांना शक्य तितक्या लवकर उंच जमिनीवर किंवा जवळच्या इमारतीच्या शिखरावर जाण्याचे आवाहन केले आहे.

309
Japan Earthquake : जपानमध्ये ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

जपानच्या उत्तर मध्य भागात सोमवारी ७.६ रिश्टर स्केल (Japan Earthquake) तीव्रतेचा भूकंप झाला. जपानच्या हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि टोयामा या किनारपट्टीच्या भागांमध्ये त्सुनामीचा इशारा दिला आहे.

(हेही वाचा – Ram Temple Threat : राम मंदिर, मुख्यमंत्री योगी आणि एसटीएफ प्रमुखांना उडवण्याची धमकी)

जपानचे सार्वजनिक प्रसारक एन. एच. के. टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जपानच्या (Japan Earthquake) हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इशिकावा आणि जवळपासच्या प्रांतात भूकंपाचे धक्के बसले असून त्यातील एकाची प्राथमिक तीव्रता ७.६ इतकी होती.

(हेही वाचा – Corona Update : भारतात २४ तासांत कोरोनाचे ८०० हून अधिक रुग्ण;लक्षणे सौम्य,मात्र काळजी घेण्याचे WHO चे आवाहन)

एनएचके टीव्हीने पाण्याचा प्रवाह ५ मीटर (१६.५ फूट) पर्यंत पोहोचू शकतो असा इशारा दिला आणि नागरिकांना शक्य तितक्या लवकर उंच जमिनीवर किंवा जवळच्या इमारतीच्या शिखरावर जाण्याचे आवाहन केले आहे. एनएचकेने दिलेल्या वृत्तानुसार, इशिकावा प्रांतातील वजीमा शहराच्या किनाऱ्यावर १ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा धडकल्या. यामागाता आणि ह्योगो प्रांतांनाही त्सुनामीचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Japan Earthquake)

(हेही वाचा – Billionaire’s Day Out : मुंबईच्या ‘या’ अब्जाधीशाने केला वेळ वाचवण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास )

यामध्ये किती नुकसान झाले याची आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाही. (Japan Earthquake)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.