अयोध्येत भव्य श्री राम मंदिराच्या उभारणीची तयारी सुरू झाली आहे. अयोध्येव्यतिरिक्त इतर राज्यांमध्येही राममंदिराबाबत दिवाळीसारखा आनंद आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुंबईत दिवाळी साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुंबईतील सर्व मंदिरे आणि प्रमुख इमारतींना रोषणाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत.
मुंबईत स्वच्छता मोहिमेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘२२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्त मी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना संपूर्ण मुंबईत दिवाळी साजरी करण्याची विनंती करतो. मंदिरे आणि इमारतींवर सजावट करून दिवे लावावेत. पुढे ते म्हणाले की, श्री राम मंदिर हे बाळासाहेब ठाकरे आणि प्रभू रामाच्या भक्तांचे स्वप्न होते. मोदींनी राम मंदिराची निर्मिती करण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करून दाखवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते पूर्ण करतात. मोदींवर सर्वांचा विश्वास आहे.’
(हेही वाचा – Billionaire’s Day Out : मुंबईच्या ‘या’ अब्जाधीशाने केला वेळ वाचवण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास )
राम मंंदिर हा लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे…
राम मंदिराच्या उद्घाटनाचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात आहे का, असे विचारले असता शिंदे म्हणाले की, राम मंदिर हा लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे, त्यामुळे तो राजकीय मुद्दा होऊ शकत नाही, मात्र “जे लोक घरून काम करण्यासाठी ओळखले जातात ते कायमचे घरीच बसतील”, असे बोलून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community