Cristiano Ronaldo : यावर्षी सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू मेस्सी नाही, तर ‘हा’ आहे

यावर्षी जागतिक फुटबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय आणि क्लब स्तरावर सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे तो पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो. पोर्तुगाल आणि अल नासर या त्याच्या क्लबसाठी मिळून २०२३ मध्ये त्याने ५४ गोल केले आहेत.

465
Cristiano Ronaldo : यावर्षी सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू मेस्सी नाही, तर ‘हा’ आहे
Cristiano Ronaldo : यावर्षी सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू मेस्सी नाही, तर ‘हा’ आहे
  • ऋजुता लुकतुके

ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी २०२३ वर्ष अनेक अर्थांनी यशदायी गेलं आहे. (Cristiano Ronaldo)

यावर्षी जागतिक फुटबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय आणि क्लब स्तरावर सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे तो पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo). पोर्तुगाल आणि अल नासर या त्याच्या क्लबसाठी मिळून २०२३ मध्ये त्याने ५४ गोल केले आहेत. आणि या कामगिरीची पुनरावृत्ती पुढील वर्षी करायची आहे, अशी ग्वाहीही त्याने चाहत्यांना दिली आहे. (Cristiano Ronaldo)

इंग्लिश स्ट्रायकर आणि कप्तान हॅरी केन या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात ५२ गोल जमा आहेत. यावर्षीच केनने बायर्न म्युनिच क्लबशी करार केला आहे. या क्लब बरोबरचा त्याचा पहिला हंगाम विलक्षण चांगला गेला आहे. (Cristiano Ronaldo)

केनच्या बरोबरीने पॅरिस सेंट गोमेन्स क्लबचा आक्रमक खेळाडू कायलन एमबापेचेही ५२ गोलच आहेत. पण, यातले आंतरराष्ट्रीय गोल तुलनेनं कमी असल्यामुळे त्याचा गोलच्या यादीत तिसरा क्रमांक लागतो. तर चौथ्या क्रमांकावर आहे मॅन्चेस्टर सिटीचा अर्लिंग हालांड. नॉर्वेच्या या स्टार फुटबॉलपटूने २०२३ मध्ये ५० गोल केले आहेत. (Cristiano Ronaldo)

(हेही वाचा – Cyber Crime : सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवीन फंडा)

अल नासर क्लबकडून (Al Nasser Club) खेळत असलेला रोनाल्डो (Cristiano Ronaldo) सध्या सौदी अरेबियातच आहे आणि तिथून मीडियाशी बोलताना त्याने यावर्षातील कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. ‘वैयक्तिक मला आणि माझ्या संघांनाही हे वर्षं चांगलं गेलं म्हणून मी खूश आहे. माझ्या क्लबकडून मी यातले ४४ गोल केले. त्यामुळे त्यांना क्लब स्पर्धेत भरीव कामगिरी करता आली. तर राष्ट्रीय संघाच्याही मी उपयोगी पडू शकलो. त्यामुळे अशीच कामगिरी पुढील वर्षी करण्याचा मी प्रयत्न करेन,’ असं रोनाल्डो गोल डॉट कॉम (Ronaldo goal.com) या बेवसाईटशी बोलताना म्हणाला. (Cristiano Ronaldo)

ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) हा फुटबॉलमधील सर्वकालीन दिग्गज खेळाडूंमध्ये गणला जातो आणि फिफाच्या बॅलन डोर पुरस्काराने पाचवेळा त्याला सन्मानित करण्यात आलं आहे. जानेवारी २०२३ पासून त्याने रियाधमधील अल नासर क्लबशी (Al Nasser Club) करार केला आहे. (Cristiano Ronaldo)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.