NASA : २०२४ मध्ये ‘हे’ अंतराळयान सूर्यावर उतरणार! नासाकडून तारीख जाहीर

नासा २०२४ला त्यांचे अंतराळ यान 'पार्कर सोलर प्रोब' (Parker Solar Probe)आगीसारखे धगधगत सूर्यावर उतरवणार आहे.

195
NASA : २०२४ मध्ये 'हे' अंतराळयान सूर्यावर उतरणार! नासाकडून तारीख जाहीर
NASA : २०२४ मध्ये 'हे' अंतराळयान सूर्यावर उतरणार! नासाकडून तारीख जाहीर

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक्सपोसॅट उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला. या मोहिमेद्वारे भारत ‘कृष्णविवर’ (Black Hole) आणि सुपरनोव्हासारख्या (Supernova) दूरवरच्या वस्तूंचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अमेरिकेनंतर अशी मोहीम राबवणारा भारत हा जगातील केवळ दुसरा देश आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने जाहीर केले आहे की, २०२४ हे वर्ष अंतराळाकरिता वैशिष्ट्यपूर्ण वर्ष असेल. नासा २०२४ला त्यांचे अंतराळ यान ‘पार्कर सोलर प्रोब’ (Parker Solar Probe)आगीसारखे धगधगत सूर्यावर उतरवणार आहे. याचा वेग ताशी १९५ किमी आहे. याबाबत नासाने काही खुलासे केले आहेत. ते अतिशय धक्कादायक आहेत.

न्यूयॉर्क ते लंडनपर्यंत फक्त 30 सेकंदांच्या अंतरावर
नासा पार्कर सोलर प्रोब (Parker Solar Probe) प्रकल्पातील शास्त्रज्ञ डॉ. नूर रौआफी यांनी अंतराळ यान पहिल्यांदा सूर्यावर उतरण्याची तारीख जाहीर केली आहे. २४ डिसेंबर २०२४ रोजी पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या सर्वात जवळ जाईल. आतापर्यंत कोणतीही मानवनिर्मित वस्तू इतक्या जवळ आलेली नाही. त्यावेळी, अंतराळ यानाचा वेग १९५ किलोमीटर प्रति सेकंद किंवा ४३५,००० मैल प्रति तास असेल. पार्कर सोलर प्रोबची गती अशा प्रकारे समजली जाऊ शकते की, न्यूयॉर्क ते लंडनचे अंतर फक्त ३० सेकंदात पूर्ण होईल. ते अगदी सूर्यावर उतरल्यासारखेच असेल; कारण त्याच्या तळाशी जाणारे कोणतेही यंत्र अद्याप तयार झालेले नाही. पार्कर सोलर प्रोब सध्या सूर्याच्या उकळत्या पृष्ठभागापासून ६१ लाख किमी अंतरावर आहे.

(हेही वाचा – Rammandir Pran Pratishtha : फक्त रामभक्तांनाच निमंत्रण; रामलल्लांच्या मुख्य पुजाऱ्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा)

संपूर्ण मानवजातीसाठी मोठी कामगिरी…
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरीचे शास्त्रज्ञ डॉ. नूर रौफी म्हणाले, “अशा प्रकारची घटना १९६९ साली चंद्रावरील लँडिंगच्या वेळी घडली होती. संपूर्ण मानवजातीसाठी ही एक मोठी कामगिरी असेल. पार्करचा वेग सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे असेल. नासाने २०१८मध्ये ही मोहीम सुरू केली होती. हे यान अवकाशात सोडण्याचा उद्देश म्हणजे वारंवार सूर्याच्या अगदी जवळून जाणे हा आहे. जेव्हा ते सूर्याच्या सर्वात जवळ असेल, तेव्हा तापमान १,४००oC पेक्षा जास्त असेल. पार्कर सोलर प्रोबचे उद्दिष्ट सूर्याच्या आवरणात प्रवेश करणे आणि त्वरीत तापमान मोजणे आणि परत येणे हे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.