सध्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक चालक (Truck Driver) तीव्र संतापले आहेत. त्यांनी सोमवार, १ जानेवारी रोजी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्या आंदोलनाला हिंसक वळण आले, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला.
(हेही वाचा BJP : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी मोडणार राजीव गांधींचा रेकॉर्ड)
काय आहे या नवीन कायद्यात?
नवीन मोटार वाहन कायद्यानुसार रस्ते अपघातात मदत केली नाही तर १० लाखांचा दंड आणि ७ वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे. या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी (Truck Driver) आज सकाळपासून जेएनपीटी मार्गावर बेलापूर नजीक कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर चक्का जाम आंदोलन सुरु केले. पोलिसांनी रस्त्यावरील ट्रक बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. मात्र दुपारी साडे बारा वाजता ट्रक चालकांनी पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी आंदोलक ट्रक चालकांनी सामान्य वाहनांना लक्ष्य केले. काचा फोडल्या. तसेच पोलिसांवर कारवाई सुरु केली. पोलिसांनी अधिक कुमक मागवली आणि लाठीचार्ज करीत ५० पेक्षा अधिक ट्रक चालकांना (Truck Driver) ताब्यात घेतले आहे.
Join Our WhatsApp Community