सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद… अवघ्या काही तासांत ‘इतक्या’ नागरिकांनी केली नोंदणी!

28 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 पासून या नोंदणीला सुरुवात झाली. या ऑनलाईन नोंदणीला भारतातील सर्व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यात आला आहे.

133

देशभरात 1 मेपासून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारकडून तिस-या टप्प्यातील लसीकरणात, 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले करण्यात आले आहे. त्यामुळे यासाठी आता ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. या रजिस्ट्रेशनला पहिल्याच दिवशी सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या तीन तासांत लाखो नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.

काही तासांत 80 लाख नागरिकांनी केली नोंदणी

1 मेपासून होणा-या सर्वात मोठ्या लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून कोविन या अधिकृत वेबसाईटवर, तसेच आरोग्य सेतू अॅपवर रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे. 28 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 पासून या नोंदणीला सुरुवात झाली. या ऑनलाईन नोंदणीला भारतातील सर्व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यात आला आहे. अवघ्या तीन तासांत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जवळपास 80 लाख नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून देण्यात आलेल्या प्रतिसादामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही याबाबतची माहिती दिली आहे.

(हेही वाचाः 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना घेता येणार लस… केंद्र सरकारचा मोठा निर्णय!)

केवळ ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार

18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना केवळ ऑनलाईन नोंदणीद्वारेच लस घेता येणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर जाण्याआधी त्यांना लसीकरणाच्या नोंदणीचा पुरावा सोबत ठेवणे आवश्यक आहे. या केंद्र सरकारने दिलेल्या आदेशांनुसार, लस उत्पादन करणा-या कंपन्यांनी आपल्या लसींची किंमत जाहीर केली आहे.

काय आहेत किंमती?

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारसाठी एका डोसची किंमत ही 600 रुपये आणि खाजगी रुग्णालयांसाठी 1200 रुपये, अशा कोवॅक्सिनच्या नव्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच निर्यात करण्यात येणार लसीसांठी एका डोसची किंमत 15 ते 20$ इतकी असणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटने आपल्या लसींच्या निश्चित करण्यात आलेल्या किंमती 28 एप्रिल रोजी कमी केल्या आहेत. सिरमने लसीची किंमत वाढवल्याने राज्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सिरमचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांना लसीची किंमत कमी करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अदर पुनावाला यांनी किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यापुढे राज्य सरकारांना सिरमची लस ४०० ऐवजी ३०० रुपयांना मिळेल. मात्र खासगी रुग्णालयांना ही लस ६०० रुपयांनाच मिळेल, असे पुनावाला यांनी स्पष्ट केले आहे. अदर पुनावाला यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

(हेही वाचाः कोविशील्डची किंमत झाली कमी! राज्य सरकारांना मिळणार ३०० रुपयांत लस! )

महाराष्ट्रात 1 मेपासून तिस-या टप्प्याचे लसीकरण नाही

२८ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त लसीकरणावर चर्चा झाली, त्यानुसार लसीकरणाच्या निर्णायक  टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील लोकांचे मोफत लसीकरण करणार आहे. त्यासाठी 2 कोटी डोस राज्य सरकार विकत घेणार आहे. यासाठी 6 हजार 500 कोटी रुपये राज्य सरकारला खर्च होणार आहे. लसीकरण पुढील 6 महिन्यांत पूर्ण करणार आहे. मात्र 1 मे रोजी लसीकरण सुरू होणार नाही, आपल्याला सबुरीने घ्यावे लागेल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

(हेही वाचाः १ मेपासून तिसऱ्या टप्प्याचे लसीकरण नाही! आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती )

WhatsApp Image 2021 04 28 at 5.43.27 PM

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.