NIA कडून दहशतवाद्यांचा अधिकृतपणे ‘जिहादी’ असा उल्लेख; २०२३ मध्ये ६२५ जणांवर कारवाई

182
कुर्ल्याचा अमान शेख पाकिस्तान गुप्तचर संघटनेचा हस्तक; NIAने काय म्हटले पुरवणी आरोपपत्रात?

कालपर्यंत दहशतवाद्यांना कोणता धर्म, रंग नसतो, असे सांगत तपास यंत्रणा मुस्लिम दहशतवाद्यांना जिहादी म्हणण्याचे टाळत असत. मात्र कट्टरता आणि धर्मांधता स्वीकारलेले मुस्लिम दहशतवादी जिहादी मनोवृत्तीचे असतात, NIA ने प्रथमच अशा दहशतवाद्यांचा जिहादी म्हणून उल्लेख केला आहे. NIA ने अधिकृत प्रसिद्ध पत्रकात तसा उल्लेख केला आहे.

१०४० ठिकाणी छापे टाकले

३१ डिसेंबर २०२३ रोजी एनआयएने २०२३ मध्ये केलेल्या कारवाईची माहिती देणारे एक प्रेस रिलीज जारी केले. (NIA) ने २०२२ मध्ये ९५७ ठिकाणी छापे टाकले होते, तर २०२३ मध्ये १०४० ठिकाणी छापे टाकले आणि दहशतवादाच्या छुप्या जागांचा पर्दाफाश केला. एनआयएने २०२३ मध्ये ६२५ भारतविरोधी कारवाया करणा-यांना पकडले. त्यापैकी ६५ दहशतवादी ISIS आणि ११४ इतर जिहादी कारवायांशी संबंधित होते. एनआयएने डाव्या नक्षलवादाचेही कंबरडे मोडले. २०२३ मध्ये NIA ने ७६ नक्षलवाद्यांना पकडले. २०२३ मध्ये अटक करण्यात आलेले ७४ दहशतवादी सिद्ध झाले आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. ५१३ विरुद्ध आरोपपत्र दाखल. या प्रकरणात NIA ची कामगिरी ९४.७ टक्के आहे, जी इतर तपास यंत्रणांपेक्षा खूपच चांगली आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) २०२३ मध्ये भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एनआयएने २०२३ मध्ये १००० हून अधिक ठिकाणी छापे टाकले. इस्लामिक स्टेट (ISIS) च्या पुणे मॉड्यूलचा पर्दाफाश करत ५०० हून अधिक दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले. परदेशात भारतीय हितसंबंधांवर प्रभाव टाकणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात आली.

(हेही वाचाBJP : २०२४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी मोडणार राजीव गांधींचा रेकॉर्ड)

५६ कोटी पेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली 

NIA ने केवळ दहशतवाद्यांना पकडले नाही तर त्यांचे आर्थिक कंबरडेही मोडले. NIA ने २०२३ मध्ये ५६ कोटी पेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. हे २०२२ च्या पाचपट आहे. एनआयएने बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांवरही पकड घट्ट केली आहे. याशिवाय अमली पदार्थांवरही कारवाई करण्यात आली आहे. २०२३ मध्ये परदेशातील भारतीय दूतावासांवर झालेल्या हल्ल्यांची गंभीर दखल घेत NIA ने ४३ संशयितांची ओळख पटवली. ५० ठिकाणी छापे टाकले. भारतातही या प्रकरणात ८० जणांची चौकशी करण्यात आली आहे. याद्वारे NIA अमेरिका आणि ब्रिटनमधील भारतीय दूतावासांवर हल्ला करण्याचा कट उघड करत आहे.

५५ लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल 

एनआयएने २०२३ मध्ये दहशतवादी आणि गुंडांच्या संगनमतावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. अशी प्रकरणे रोखण्यासाठी एनआयएने २०२३ मध्ये २५० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आणि ५५ लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी NIA ची स्थापना करण्यात आली होती, हे विशेष. २०१४ नंतर एनआयएला नवीन तंत्रज्ञान आणि अधिक स्वातंत्र्याद्वारे बळकटी मिळाली आहे. NIA ची स्थापना झाल्यापासून देशातील दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.