मुंबईत सध्या संपूर्ण स्वच्छता मोहिम अर्थात डीप क्लिनिंग ड्राईव्ह (Deep Cleaning Drive) राबवण्यात येत असून या अंतर्गत मुंबईत स्वच्छता राखण्याच्या दृष्टीकोनातून दंडात्मक कारवाई केली जात आहे. यानुसार स्वच्छ आंगण अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार ४ नोव्हेंबर २०२३ पासून आतापर्यंत ७२० जणांवर कारवाई करून एकूण २७ लाख १९ हजार २०० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. (Deep Cleaning Drive)
मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने संपूर्ण स्वच्छता मोहिम (Deep Cleaning Drive) राबवण्यात येत असून हे स्वच्छतेचे मॉडेल राज्यात आणि देशात राबवण्यात येणार आहे. या स्वच्छतेचा एक भाग म्हणून प्रत्येक परिसर स्वच्छ राखतानाच जर कुणी उघड्यावर कचरा टाकला तर त्याला दंडात्मक कारवाई (Penal action) करण्यात येत आहे. त्याप्रमाणे उघड्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून ४ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये एकूण ७२० लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. उघड्यावर कारवाई करण्यासाठी दोनशे रुपयांपासून दंड आकारला जातो. त्याप्रमाणे आतापर्यंत २७ लाख १९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (Deep Cleaning Drive)
(हेही वाचा – Gujarat Surya Namaskar : गुजरातने वर्षाच्या पहिल्या दिनी केला विश्वविक्रम; पंतप्रधानांनी केले ‘हे’ आवाहन)
या विभागात केवळ ६८ लोकांवर कारवाई
आतापर्यंत सर्वांत जास्त करवाई करण्यात आलेल्या विभागांमध्ये सी विभाग आघाडीवर आहे. चंदनवाडी, गिरगाव आदी भागांमध्ये एकूण १७० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याप्रमाणे ३५ हजार २०० रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. तर सर्वाधिक जास्त दंड हा वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम भाग असलेल्या एच पश्चिम भागात सुमारे ४ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या विभागात केवळ ६८ लोकांवर कारवाई करून ही एवढा दंड वसूल केला. (Deep Cleaning Drive)
मुलुंड टी विभागात २७ लोकांवर कारवाई करून २ लाख ७० हजारांचा दंड वसूल करण्यात आला, तर कुर्ला एल विभागात ५९ लोकांवर कारवाई करून २ लाख ६८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मालाड पी उत्तर विभागात २१ लोकांवर कारवाई करून २ लाख १० हजारांचा दंड वसूल केला आहे. त्याखालोखाल एच पूर्व विभागात २९ लोकांवर कारवाई करून २ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर के पूर्व आणि के पश्चिम विभागात अनुक्रमे १ लाख ९२ हजार रुपये आणि २ लाख ४१ हजार रुपये एवढ्या दंडाची रक्कम वसूल केली. या दोन विभागात अनुक्रमे ३९ व २० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. (Deep Cleaning Drive)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community