Japan Earthquake : एक डझनहून अधिक भूकंपाच्या धक्क्यांनी जपान हादरलं; अंगावर शहारे आणणारे व्हिडीओ व्हायरल

जपानच्या उत्तर मध्य भागात सोमवारी ७.६ रिश्टर स्केल (Japan Earthquake) तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर जपानच्या हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि टोयामा या किनारपट्टीच्या भागांमध्ये त्सुनामीचा इशारा दिला आहे.

459
Japan Earthquake : एक डझनहून अधिक भूकंपाच्या धक्क्यांनी जपान हादरलं; अंगावर शहारे आणणारे व्हिडीओ व्हायरल

जपान हवामानशास्त्र एजन्सीने इशिकावाच्या समुद्रकिनारी भागात आणि आसपासच्या प्रांतांमध्ये एक डझनहून अधिक भूकंपाची (Japan Earthquake) नोंद केली, ज्यापैकी सर्वात मोठा ७.६-तीव्रतेचा भूकंप होता. भूकंपामुळे जपानच्या होन्शू या मुख्य बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर आग लागली आणि अनेक इमारती कोसळल्या. मात्र किती लोक जखमी झाले हे अजून स्पष्ट झालेले नाही.

३० हजारहून हून अधिक घरांची वीज खंडित –

भूकंपाच्या धक्क्याने (Japan Earthquake) किमान सहा घरांचे नुकसान झाले असून लोक आत अडकले आहेत, असे सरकारचे प्रवक्ते योशिमासा हयाशी यांनी सांगितले. इशिकावा प्रांतातील वाजिमा शहरात लागलेल्या आगीत ३० हजारहून हून अधिक घरांची वीज खंडित झाली, असे ते म्हणाले. दरम्यान एजन्सीने इशिकावासाठी त्सुनामीचा मोठा इशारा आणि होन्शू बेटाच्या उर्वरित पश्चिम किनारपट्टीसाठी आणि होक्काइडोच्या उत्तरेकडील सुदूर भागासाठी कमी पातळीवरील त्सुनामीचा इशारा किंवा सल्ला जारी केला.

(हेही वाचा – Japan Earthquake : जपानमध्ये ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा)

आणखी भूकंपाचे धक्के जाणवणार –

तसेच पुढील काही दिवसांत आणखी भूकंपाचे धक्के (Japan Earthquake) जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापूर्वी, जपानच्या सरकारी प्रसारक एन. एच. के. टीव्हीने समुद्रात पाच मीटरपर्यंतच्या लाटा वाढू शकतात असा इशारा दिला होता.एन. एच. के. टीव्हीच्या म्हणण्यानुसार, त्सुनामीच्या लाटा पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – GST Collection : देशातील जीएसटी संकलनात १२ टक्के वाढ)

प्रत्येक मिनिट महत्त्वाचा –

सरकारचे प्रवक्ते योशिमासा हयाशी यांनी पत्रकारांना सांगितले की, भूकंपग्रस्त भागात (Japan Earthquake) आण्विक सुविधांचे नुकसान झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांना लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, “प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. कृपया तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा.’’

(हेही वाचा – Ayodhya: राम मंदिरात प्रतिष्ठापना मूर्तीची निवड अखेर निश्चित, शिल्पकार योगीराज अरुण यांनी साकारलेल्या मूर्तीची गाभाऱ्यात स्थापना)
भूकंपामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या –

एन. एच. के. च्या म्हणण्यानुसार, बाधित भागात बुलेट ट्रेनचे काम थांबवण्यात आले आहे. त्यानुसार महामार्गाचे काही भाग बंद करण्यात आले आहेत आणि अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन तुटल्या आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, भूकंपामुळे (Japan Earthquake) अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. हवामान संस्थेने पत्रकार परिषदेत सांगितले की, पुढील आठवड्यात, विशेषतः पुढील दोन किंवा तीन दिवसांत या भागात आणखी मोठे भूकंप होऊ शकतात. (Japan Earthquake)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.