Nagpur Fire : नागपूरच्या कोंढाळी भागातील आठ ते दहा दुकानं आगीच्या भक्षस्थानी

स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्री तीन - साडेतीन पर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र तोपर्यंत येथील एक चाळ जळून खाक झाली.

214
Nagpur Fire : नागपूरच्या कोंढाळी भागातील आठ ते दहा दुकानं आगीच्या भक्षस्थानी

नवीन वर्षाची सुरुवात काहीशी अपघातांची झाली आहे. काही ठिकाणी रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती तर (Nagpur Fire) कुठे आगीच्या घटना घडल्या आहेत. अशातच नवीन वर्षाच्या सुरुवातीला मध्यरात्री नागपुरात कोंढाळी भागातील आठ ते दहा घरांना भीषण आग लागली.

New Project 2024 01 02T094019.109

अधिक माहितीनुसार, मंगळवार २ जानेवारीच्या मध्यरात्री कोंढाळी नगरपंचायतमधील दैनिक दुकान (Nagpur Fire) चाळतील तब्बल ८ ते १० दुकानांना मोठी आग लागली. आगीची माहिती कळताच नागरीकांनी आग ही आग विझविण्यासाठी धावाधाव केली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी घाव घेतली.

(हेही वाचा – Japan Earthquake : एक डझनहून अधिक भूकंपाच्या धक्क्यांनी जपान हादरलं; अंगावर शहारे आणणारे व्हिडीओ व्हायरल)

त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्री तीन – साडेतीन पर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात (Nagpur Fire) अग्निशमन दलाला यश आले. मात्र तोपर्यंत येथील एक चाळ जळून खाक झाली.

(हेही वाचा – Ayodhya: प्रभु रामाच्या स्वागताचा अनोखा थाट…अभिषेकासाठी १६ पवित्र नद्यांचे जल, भंडाऱ्यासाठी बासमती तांदूळ; वाचा सविस्तर…)

शॉर्टसर्किटमुळे ही आग (Nagpur Fire) लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी दुकानदारांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.