Ayodhya: प्रभु श्रीरामाच्या स्वागताचा अनोखा थाट…अभिषेकासाठी १६ पवित्र नद्यांचे जल, भंडाऱ्यासाठी बासमती तांदूळ; वाचा सविस्तर…

देशाच्या विविध भागांतील भक्त राम लल्लासाठी यथाशक्ती मदत करत आहेत.

352
Ayodhya: प्रभु श्रीरामाच्या स्वागताचा अनोखा थाट...अभिषेकासाठी १६ पवित्र नद्यांचे जल, भंडाऱ्यासाठी बासमती तांदूळ; वाचा सविस्तर...
Ayodhya: प्रभु श्रीरामाच्या स्वागताचा अनोखा थाट...अभिषेकासाठी १६ पवित्र नद्यांचे जल, भंडाऱ्यासाठी बासमती तांदूळ; वाचा सविस्तर...

अयोध्येत (Ayodhya) २२ जानेवारीला राम लल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर भव्य महालात विराजमान होणार आहेत. देशभरातील भक्त श्रीरामाचे स्वागत करण्यासाठी उत्साही आहेत. प्रत्येक जण आपआपल्या क्षमतेनुसार, या प्रतिष्ठापना सोहळ्यात मनापासून योगदान देत आहे. देशाच्या विविध भागांतील भक्त राम लल्लासाठी यथाशक्ती मदत करत आहेत.

ननिहाल छत्तीसगड येथून मोठ्या प्रमाणात बासमती तांदूळ अयोध्येत पाठवण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय भांडारगृह रामसेवक पुरममध्ये हा तांदूळ साठवण्यात आला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ट्रस्ट आणि विहिंपच्या सहाकार्याने अयोध्येत ३६ ठिकाणी रामभक्तांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाईल. या कार्यात विश्व हिंदू परिषदेचे (VHP)कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत याव्यतिरिक्त साखर, चहाची पाने, देशी तूप, तेल, आले, मसाले आणि खाद्यपदार्थ देशभरातून येत आहेत. लाखो लोकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यासाठी ट्रस्ट मोठी तयारी करत आहे.

(हेही वाचा – Japan Earthquake : एक डझनहून अधिक भूकंपाच्या धक्क्यांनी जपान हादरलं; अंगावर शहारे आणणारे व्हिडीओ व्हायरल )

अभिषेकासाठी पवित्र नद्यांचे पाणी…
भगवान श्रीरामाचे सासर नेपाळ (जनकपूर) येथून १६ पवित्र नद्यांचे पाणी अयोध्येत पाठवण्यात आले आहे. या नद्यांच्या पाण्याचा अभिषेक राम लल्लाच्या मूर्तीवर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादरम्यान केला जाणार आहे, असे सांगण्यात येत आहे.

बासमती तांदळाचा पुरवठा…
सेंट्रल वेअरहाऊसचे प्रमुख अच्युतानंदन म्हणाले की, बासमती तांदूळ छत्तीसगडमधील भगवान रामाच्या मामाच्या घरातून आला आहे. छत्तीसगडमधून आतापर्यंत १०० टन तांदूळ अयोध्येत पोहोचला आहे. अजूनही तांदळाचा पुरवठा होत आहे. राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा समारंभाला येणाऱ्या भक्तांच्या जेवणात या तांदळाचा वापर केला जाईल. अयोध्येतून कोणीही उपाशी राहू नये हा ट्रस्टचा हेतू आहे, असे केंद्रीय भंडारण प्रभारी म्हणाले. आतापर्यंत देशभरातून साखर, तांदूळ, पीठ, डाळी, तूप, मसाले, चहाची पाने राम लल्लाच्या भक्तांसाठी आली आहेत.

३६ ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन
विश्व हिंदू परिषदेकडून अयोध्येत जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे, असे विहिंपचे कार्यकर्ते आणि केंद्रीय भांडारगृहाचे सह-प्रभारी हृदय नारायण चतुर्वेदी यांनी सांगितले. यामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ३६ विविध ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन केले आहे. छत्तीसगडमधून आलेला तांदूळ या भंडाऱ्याकरिता वापरला जाईल. याकरिता विविध ठिकाणांहून पाठवण्यात आलेल्या तांदळाची साठवणूक केली जात आहे. ज्या ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन केले आहे त्या ठिकाणी विविध खाद्यपदार्थ पाठवले जातील, अशी माहिती ह्रदय नारायम चतुर्वेदी यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.