Meteorology Department: ऐन हिवाळ्यात कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी, वाचा हवामान विभागाचा अंदाज

हलक्या पावसामुळे दिवसा गारवा जाणवण्याची शक्यता आहे.

224
Meteorology Department: ऐन हिवाळ्यात कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Meteorology Department: ऐन हिवाळ्यात कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी, वाचा हवामान विभागाचा अंदाज

कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या राज्यात थंडीचा जोर ओसला आहे. अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. (meteorology department ) राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा १० अंशाच्या वर गेला आहे.

राज्यात बाष्पयुक्त वारे येऊन ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४ दिवस किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. हलक्या पावसामुळे दिवसा गारवा जाणवण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Japan Earthquake : एक डझनहून अधिक भूकंपाच्या धक्क्यांनी जपान हादरलं; अंगावर शहारे आणणारे व्हिडीओ व्हायरल)

बंगाल उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्यात येण्याची शक्यता
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगाल उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढून राज्यात बाष्पयुक्त वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी ५ जानेवारीनंतर पुढील २-३ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.