Isaac Asimov : विज्ञानकथा लिहिणारे महान लेखक आयझॅक आसिमॉव्ह

302
Isaac Asimov : विज्ञानकथा लिहिणारे महान लेखक आयझॅक आसिमॉव्ह
Isaac Asimov : विज्ञानकथा लिहिणारे महान लेखक आयझॅक आसिमॉव्ह

आयझॅक असिमोव्ह (Isaac Asimov) हे अमेरिकन विज्ञानकथा लेखक आणि बोस्टन विद्यापीठातील बायोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक होते. त्यांच्या विज्ञानकथा जगप्रसिद्ध आहेत. त्यांनी ५०० हून अधिक पुस्तके लिहिली आणि संपादित केली आहेत. ते आजपर्यंतचे सर्वात अधिक लेखन करणारे आणि सर्वोत्कृष्ट विज्ञान-लेखकांपैकी एक आहेत.

त्यांनी रचलेली फाउंडेशन सीरिज खूप गाजली. त्यापैकी पहिल्या तीन पुस्तकांना १९६६ साली Hugo Award मिळाला आहे. त्यांच्या आणखी गाजलेल्या कथा-मालिका म्हणजे गॅलेक्टिक एम्पायर सीरिज आणि रोबोट सीरिज… त्याचबरोबर त्यांनी ३८० हून अधिक लघुकथा देखील लिहिल्या आहेत. “नाईटफॉल” या सामाजिक विज्ञान कल्पित कादंबरीला प्रचंड प्रतिसाद लाभला होता. या कादंबरीची निवड १९६४ मध्ये अमेरिकेच्या सायन्स फिक्शन रायटर्सद्वारे सर्वोत्कृष्ट लघु विज्ञान कथा झाली होती.

(हेही वाचा-Nagpur Fire : नागपूरच्या कोंढाळी भागातील आठ ते दहा दुकानं आगीच्या भक्षस्थानी)

त्यांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्यांनी पॉल फ्रेंच हे टोपण नाव वापरून ’लकी स्टार’ ही किशोरवयीन विज्ञान-कथा मालिका लिहिली. त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कथा विज्ञानाचा मागोवा घेतात, अगदी जेव्हा विज्ञान विकसित होऊ लागले होते, त्या काळात जाऊन शोध घेतात, लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करतात. त्यामुळेच आजही त्यांच्या कथा चिरंजीव वाटतात.

त्याचबरोबर त्यांनी रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, इतिहास, बायबलसंबंधी व्याख्या आणि साहित्यिक टीका लिहिल्या आहेत. अवांतर लेखन करत असताना विज्ञानकथेतील त्यांचा जिवंतपणा कधीच कमी झाला नाही. ६ एप्रिल १९९२ रोजी या महान लेखकाचे निधन झाले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.