संपूर्ण देशभरातील नागरिक अयोध्यत होणाऱ्या प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची आतुरतेने वाट बघत आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, अशी भावना प्रत्येक रामभक्ताच्या मनात आहे. धैर्य, वीरता, त्याग…अशा श्रीरामाच्या विविध गुणवैशिष्ट्यांची भाविकांच्या मनात जागरुकता निर्माण व्हावी, याकरिता अयोध्येतील शहरांमध्ये रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’ मालिका दाखवली जात आहे.
नवीन पिढीत श्रीरामाच्या जीवनाचा आदर्श, त्याने सांगितलेली मूल्ये रुजावीत याकरिता योगी सरकारने शहरातील विविध ठिकाणी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेचे प्रसारण सुरू केले आहे. एलईडी स्क्रीनवर शहरातील विविध ठिकाणी एलईडी डिस्प्ले स्क्रीनच्या माध्यमातून लोकांना रामायण बघण्याची संधी मिळत आहे.
(हेही वाचा – Isaac Asimov : विज्ञानकथा लिहिणारे महान लेखक आयझॅक आसिमॉव्ह )
२५ डिसेंबरपासून सुरुवात…
अयोध्येतील शहरात ७ विविध ठिकाणी २५ डिसेंबरपासून या मालिकेचे प्रसारण सुरू झाले आहे. सूचना आणि जनसंपर्क विभागाद्वारे रामकथ पार्क संग्रहालय, कनक भवन श्रीराम आश्रम, अशर्फी भवन, लक्ष्मण किला इत्यादी ठिकाणी सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ‘रामायण’ मालिका प्रसारित करण्यात येते. येथील नागरिक मोठ्या संख्येने मालिका पाहण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे अयोध्येत सध्या सर्वत्र रस्त्यारस्त्यांवर रामायण मालिकेचे संगीत कानी ऐकू येत आहे. संगीतकार रवींद्र जैन यांनी या मालिकेतील गाण्यांना संगीतबद्ध केले होते.
हेही पहा –