लॉरेन्स बिश्नोई टोळीचा एक प्रमुख सदस्य ब्रार (Goldy Brar) याने २९ मे २०२२ रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. पंजाबमधील फरीदकोट येथील रहिवासी असलेला ब्रार, ज्याचे खरे नाव सतिंदरजीत सिंग आहे, २०१७ मध्ये विद्यार्थी व्हिसावर कॅनडाला गेला.
बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित –
केंद्रीय गृह मंत्रालयाचे (एमएचए) अतिरिक्त सचिव प्रवीण वशिष्ठ यांनी एका राजपत्रित अधिसूचनेत म्हटले आहे की, सध्या कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे राहणारा सतविंदर सिंग उर्फ सतिंदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार (Goldy Brar) हा बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित आहे.आणि बब्बर खालसा इंटरनॅशनल ही दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते.
(हेही वाचा – Ind vs SA 2nd Test : भारतीय संघ दुसऱ्या कसोटीसाठी केपटाऊनला पोहोचला तो क्षण )
सीमेपलीकडून ड्रोनद्वारे उच्च दर्जाची शस्त्रे, स्फोटक सामग्रीची तस्करी –
अधिसूचनेत म्हटले आहे की, “सीमापार एजन्सीच्या पाठिंब्याने गोल्डी (Goldy Brar) अनेक हत्यांमध्ये सामील होता आणि कट्टरपंथी विचारधारेचा दावा करत होता. तो राष्ट्रवादी समर्थक नेत्यांना धमकी देणारे कॉल करत होता. खंडणीची मागणी करत होता आणि हत्यांचे दावे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत होता. त्याचप्रमाणे तो सीमेपलीकडून ड्रोनद्वारे उच्च दर्जाची शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटक सामग्रीची तस्करी करण्यात गुंतलेला आहे.
Ministry of Home Affairs has declared gangster Satwinder Singh alias Satinderjit Singh alias Goldy Brar as a terrorist under the Unlawful Activities (Prevention) Act, 1967. pic.twitter.com/9Ea9R6VlQ5
— ANI (@ANI) January 1, 2024
फ्रान्स यांनी त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली –
“गोल्डी (Goldy Brar) आणि त्याचे सहकारी पंजाबमधील शांतता, जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट रचत आहेत, ज्यात तोडफोड, दहशतवादी मॉड्यूल्स उभारणे, लक्ष्यित हत्या करणे आणि इतर राष्ट्रविरोधी कारवाया करणे यांचा समावेश आहे. इंटरपोल सचिवालय जनरल (आयपीएसजी) ल्योन, फ्रान्स यांनी त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती आणि १२ डिसेंबर २०२२ रोजी त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. तसेच १५ जून २०२२ रोजी एक लुक आउट परिपत्रक देखील जारी करण्यात आले होते.
(हेही वाचा – Ayodhya: अयोध्येत विविध ठिकाणी ‘रामायण’ मालिकेचे प्रसारण सुरू, नागरिकांची रस्त्यावर मोठ्या संख्येने गर्दी)
मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारताना ब्रार (Goldy Brar) यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते, “सचिन बिश्नोई धत्तरनवाली, लॉरेन्स बिश्नोई आणि मी सिद्धू मूसेवालाच्या हत्येमागे आहोत”.
विकी मिद्दुखेडाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी मूसेवालाची हत्या –
युवा अकाली दलाचा नेता विकी मिद्दुखेडा याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी त्याने मूसेवालाची हत्या केल्याचा दावा केला होता. २०२२ मध्ये कोटकपुरा येथे झालेल्या डेरा अनुयायी प्रदीप सिंग कटारियाच्या हत्येची जबाबदारीही देखील ब्रार (Goldy Brar) याने घेतली होती. तसेच २०१५च्या बरगारी अपवित्रता प्रकरणातील आरोपी कटारिया जामिनावर बाहेर आला होता आणि त्याच वर्षी ११ नोव्हेंबर रोजी सहा जणांच्या गटाने त्याची त्याच्या दुकानात गोळ्या घालून हत्या केली होती.
(हेही वाचा – Japan Earthquake : एक डझनहून अधिक भूकंपाच्या धक्क्यांनी जपान हादरलं; अंगावर शहारे आणणारे व्हिडीओ व्हायरल)
पंजाबमध्ये चालवल्या जाणाऱ्या खंडणी रॅकेटमध्येही ब्रारचा सहभाग असल्याचा आरोप आहे. तसेच युवा काँग्रेस नेते गुरलाल पहलवान यांच्या हत्येत त्याचा (Goldy Brar) हात असल्याचे मानले जाते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community