WFI Election Row : कुस्तीची तात्पुरती समिती आणि नवनियुक्त कार्यकारिणीत कलगीतुरा सुरूच

आपली कार्यकारिणी निवडून आली असल्यामुळे तीच खरी कार्यकारिणी आहे, असा संजय सिंग यांचा दावा आहे. तर आयओसी नियुक्त समितीने राष्ट्रीय स्पर्धा, शिबिरं यांच्याविषयीचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. 

200
WFI Row : कुस्ती फेडरेशनच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांना क्रीडा मंत्रालयाची मान्यता नाहीच
WFI Row : कुस्ती फेडरेशनच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांना क्रीडा मंत्रालयाची मान्यता नाहीच
  • ऋजुता लुकतुके

आपली कार्यकारिणी निवडून आली असल्यामुळे तीच खरी कार्यकारिणी आहे, असा संजय सिंग (Sanjay Singh) यांचा दावा आहे. तर आयओसी (IOC) नियुक्त समितीने राष्ट्रीय स्पर्धा, शिबिरं यांच्याविषयीचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. (WFI Election Row)

भारतीय कुस्तीमध्ये (Indian wrestling) अजूनही काही आलबेल झालेलं नाही. नवनिर्वाचित कार्यकारिणी क्रीडा मंत्रालयाने बरखास्त केली आणि तीन सदस्यीत तात्पुरती समिती नेमली. तरी या दोन्ही पक्षांनी कुस्ती फेडरेशनवर दावा केला आहे. एका आठवड्यापूर्वी अध्यक्ष म्हणून निवड झालेले संजय सिंग (Sanjay Singh) यांनी कार्यकारिणीच्या बरखास्तीचा क्रीडा मंत्रालयाचा (Ministry of Sports) निर्णय अमान्य असल्याचं म्हटलंय. आणि आपणच कुस्तीचा कारभार करणार असं मीडियाला दिलेल्या मुलाखतीत ठासून सांगितलंय. (WFI Election Row)

तर त्यांची कार्यकारिणी बरखास्त करून नेमलेल्या त्रिसदस्यीय तात्पुरत्या समितीने कुस्तीचा कारभार हातात घेत जानेवारीत राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा केली आहे. पाठोपाठ या समितीने सोमवारी राष्ट्रीय शिबिराच्या तारखाही जाहीर केल्या. (WFI Election Row)

इतकंच नाही, तर कुठल्याही कुस्तीपटूने बरखास्त केलेल्या कार्यकारिणीच्या सदस्याशी संपर्क साधू नये अशी तंबीही या तात्पुरत्या समितीने दिली आहे. क्रीडा मंत्रालय (Ministry of Sports) आणि ऑलिम्पिक असोसिएशन तसंच क्रीडा प्राधिकरण यांचा पाठिंबा या तात्पुरत्या समितीलाच आहे. (WFI Election Row)

(हेही वाचा – Manipur Violence : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमध्ये हिंसाचार कायम; तीन जणांचा मृत्यू)

२० संघटनांचा संजय सिंग यांना पाठिंबा 

दुसरीकडे संजय सिंग (Sanjay Singh) यांनी आपली निवड लोकशाही पद्धतीने झाल्यामुळे कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय बेकायदेशीर असल्याची भूमिका घेतली आहे. राज्य कुस्ती संघटनांपैकी जवळ जवळ २० संघटनांचा पाठिंबा संजय सिंग (Sanjay Singh) यांना असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (WFI Election Row)

‘कुस्ती फेडरेशनचं निलंबन आम्ही अमान्य करतो. तसंच तात्पुरत्या समितीलाही आमची मान्यता नाही. कुस्ती फेडरेशनची निवडणूक २१ डिसेंबरला झाली होती. आणि यात मी अध्यक्ष म्हणून तर माझं पॅनलही विविध जागांवर निवडून आलं. आता कुस्तीचा कारभार आमच्या हातात आहे. आणि येत्या काही दिवसांत आम्ही राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा करू,’ असं संजय सिंग (Sanjay Singh) यांनी टाईम्स वृत्तसमुहाशी बोलताना सांगितलं. (WFI Election Row)

२१ डिसेंबरला संजय सिंग (Sanjay Singh) यांचं पॅनल निवडून आलं आणि २४ तारखेला क्रीडा मंत्रालयाने फेडरेशनवरच निलंबनाची कारवाई केली. निर्णय प्रक्रिया देशाच्या क्रीडा धोरणाशी विसंगत असल्याचा ठपका क्रीडा मंत्रालयाने ठेवला होता. पण, आता संजय सिंग (Sanjay Singh) यांनी निलंबनाची कारवाई मान्य नसल्याचं आणि त्या विरोधात कोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत कुस्ती मधील हा कलगीतुरा आणखी विदारक होण्याची चिन्हं आहेत. आणि नुकसान अर्थातच, खेळाडूंचं होणार आहे. (WFI Election Row)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.