Truck-Tanker Drivers Strike: मुंबईतील २१० पेट्रोल पंप रात्रीपर्यंत बंद पडणार? अन्याय करणारे धोरण तातडीने मागे घेण्याची मागणी

रात्रीपर्यंत पुरवठा सुरू न झाल्यास सर्व पंप ठप्प होणार, अशी माहिती पेट्रोल पंप मालक असोसिएशनने दिली आहे.

264
Truck-Tanker Drivers Strike: मुंबईतील २१० पेट्रोल पंप रात्रीपर्यंत बंद पडणार? अन्याय करणारे धोरण तातडीने मागे घेण्याची मागणी
Truck-Tanker Drivers Strike: मुंबईतील २१० पेट्रोल पंप रात्रीपर्यंत बंद पडणार? अन्याय करणारे धोरण तातडीने मागे घेण्याची मागणी

ट्रक-टँकर चालकांनी (Truck-Tanker Drivers Strike) पुकारलेल्या संपाचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. याचा परिणाम म्हणून बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील २१० पैकी निम्मे पंप बंद होण्यास सुरुवात झाली आहे. रात्रीपर्यंत पुरवठा सुरू न झाल्यास सर्व पंप ठप्प होणार, अशी माहिती पेट्रोल पंप मालक असोसिएशनने दिली आहे.

केंद्र सरकारने नव्याने केलेला रस्ते सुरक्षा अपघात कायदा जाचक आणि अन्यायकारक असल्याचे सांगत त्याच्या निषेधार्थ मनमाडनजीक पानेवाडी, नागापूर परिसरात असलेल्या तेल कंपन्यांच्या चालकांनी संप पुकारल्याने सोमवारी तीनही कंपन्यांतून एकही टँकर इंधन भरून बाहेर पडू शकला नाही. या संपामुळे मनमाड परिसरातील तेल प्रकल्पातून राज्यातील तब्बल १२ जिल्ह्यांत होणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे इंधनटंचाईचे संकट ओढवले आहे.

(हेही वाचा – Chandrapur: विजासन लेणीवरील ऐतिहासिक बुद्ध लेणीची विटंबना, चंद्रपुरात विविध ठिकाणी आंदोलन )

नव्या कायद्याला विरोध का?
केंद्र सरकारच्या नव्या कायद्यानुसार, इंधन टँकर किंवा ट्रकचा अपघात झाल्यास आणि चालक अपघातस्थळावरून पळून गेल्यास थेट १० वर्षे तुरुंगवास आणि ७ लाख रुपये दंड, अशी तरतूद असल्याचे टँकर चालकांचे म्हणणे आहे. केंद्राचा हा रस्ते अपघात सुरक्षा कायदा जाचक आणि अन्यायकारक असल्याचे सांगत टँकरचालकांनी या कायद्याला तीव्र विरोध दर्शवला असून सोमवारपासून संप पुकारला. या संपाला टँकर मालकांनीही पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे पानेवाडी, नागापूर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या तीनही कंपन्यांतून राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये दररोज दीड हजार टँकर भरून जातात. तिन्ही कंपन्यांत इंधन टँकर भरण्याचे काम सुरू होण्यापूर्वी चालकांनी आदल्या दिवसापासूनच इंधन भरण्यासाठी आलेल्या टँकरचालकांना टँकर भरून कंपनीतून रवाना केले. अवघे पाच-सहा टँकर भरून झाल्यावर या टँकरचालकांनी अचानक काम बंदचा पुकारा केला. केंद्र सरकार, मोदी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत त्यांनी कोणत्याही कंपनीतून एकही टँकर भरून जाऊ दिला जाणार नाही, असा पवित्रा घेतला. टँकरचालक संघटनेचे सर्वच पदाधिकारी, सभासद या संपात सामील झाले.

७५ लाख लिटर इंधन ठप्प
मनमाडनजीक असलेल्या ३ महत्त्वाच्या इंधन कंपन्यांतून दररोज हजारावर टँकरमधून ७५ लाख लिटर पेट्रोल-डिझेल राज्यभरात जाते. महिनाअखेरीस तिन्ही कंपन्यांतून १२००ते १५०० टँकर भरून जातात, मात्र आता संपामुळे ७५ लाख लिटर इंधनाचा पुरवठा ठप्प आहे. या संपामुळे नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, अकोला, बुलढाणा, नंदुरबार, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी व नांदेड हे जिल्हे प्रभावित झाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.