केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात देशभरात ट्रक चालकांनी (Transporters Strike) सोमवारपासून संप पुकारला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या संपामुळे राज्यातील पेट्रोलपंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंधन मिळणार नाही या चिंतेमुळे सोमवारी रात्रीपासून पेट्रोल पंपांवर वाहनचालकांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले.
केंद्र सरकारने आणलेल्या ‘हिट अँड रन’ कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक आणि डंपर चालक संपावर गेले आहेत. हा कायदा चुकीचा असून तो मागे घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, दिल्ली-हरियाणा, पंजाब आणि उत्तरप्रदेशसह देशाच्या विविध भागात ट्रकचालकांनी आपले ट्रक रस्त्यांवर उभे करून रस्ते अडवले आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Manipur Violence : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमध्ये हिंसाचार कायम; तीन जणांचा मृत्यू )
नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याच शक्यता आहे. यापूर्वी, आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे. यालाच हिट-अँड-रन कायदा असे म्हटले आहे. यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसांत जामीन मिळायचा आणि तो पोलिस ठाण्यातूनच बाहेर पडत असे. मात्र, या कायद्यांतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community