जपानमधील टोकियो हनेडा विमानतळाच्या (Japan’s Haneda airport) धावपट्टीवर मंगळवार, 2 जानेवारी रोजी 2 विमानांची टक्कर झाल्यानंतर भीषण आग लागली. (Japan Plane Fire) या विमानात 379 प्रवासी होते. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप बचावले. एन.एच.के. या जपानी वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, विमानतळावर उतरतांना दोन विमानांची टक्कर झाल्यानंतर एका विमानाला धावपट्टीवर आग लागली. विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हानेडाने घटनेनंतर सर्व धावपट्ट्या बंद केल्या आहेत. एक विमान जपान एअरलाइन्सचे (Japan Airlines) होते, तर दुसरे तटरक्षक दलाचे होते.
(हेही वाचा – Truck Driver Strike : ट्रकचालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांचा स्कूल बस चालकांना इशारा; म्हणाले,…)
#WATCH | A Japan Airlines jet was engulfed in flames at Tokyo’s Haneda airport after a possible collision with a Coast Guard aircraft, with the airline saying that all 379 passengers and crew had been safely evacuated: Reuters
(Source: Reuters) pic.twitter.com/fohKUjk8U9
— ANI (@ANI) January 2, 2024
सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप
जपानी माध्यमांनुसार, आग लागलेल्या विमानाचा क्रमांक जे.ए.एल. 516 होता. त्याने होक्काइडो (Hokkaido) येथून उड्डाण केले होते. विमान स्थानिक वेळेनुसार 16:00 वाजता न्यू चिटोज विमानतळावरून निघाले आणि 17:40 वाजता हनेडामध्ये उतरण्याचे ठरले. एन.एच.के. वरील थेट फुटेजमध्ये विमानाच्या खिडक्यांमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे दिसून आले. सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे, असे विमान कंपनीने सांगितले.
जपान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तटरक्षक दलाने सांगितले की, त्यांचे एक विमान हनेडा विमानतळावर जपान एअरलाइन्सच्या (Japan Airlines) विमानाला धडकले. तटरक्षक दलाच्या विमानात एकूण 6 जण होते. घटनेनंतर त्यापैकी पाच जण बेपत्ता झाले होते, परंतु त्यांचा शोध घेण्यात आला आहे.
(हेही वाचा – Thane: अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ठाण्यातील ६५ मंदिरांत दीपोत्सव)
1985 नंतरचा सर्वांत घातक अपघात
जपानमध्ये अनेक दशकांपासून कोणतेही गंभीर विमान अपघात झालेले नाहीत. याआधी जपानमध्ये सर्वांत घातक विमान अपघात 1985 मध्ये झाला होता. जेव्हा टोकियोहून (Tokyo) ओसाकाला (Osaka) जाणारे JALचे जम्बो जेट मध्य गुनमा प्रदेशात कोसळले होते. सर्व 520 प्रवासी आणि कर्मचारी ठार झाले.
जानेवारी 2023 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात पाच भारतियांसह 72 जणांचा मृत्यू झाला होता. मानवी चुकांमुळे ही घटना घडली. 15 जानेवारी 2023 रोजी येती एअरलाइन्सचे विमान उतरण्याच्या काही मिनिटांपूर्वीच कोसळले. या विमानात पाच भारतियांसह एकूण 72 लोक होते.
हेही पहा –