Mumbai Road Bridges : बोरीवली, दहिसरमधील ३५ पुलांची होणार डागडुजी

मुंबईतील आता पुलांची डागडुजीचे काम हाती घेण्यात येत असून मुंबईतील विविध भागांमधील पुलांची दुरुस्ती केली जात असतानाच आता बोरीवली व दहिसरमधील तब्बल ३५ स्कायवॉकसह पुलांची मलमपट्टी केली जाणार आहे. या तब्बल ३५ पुलांच्या डागडुजीसाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

480
Mumbai Road Bridges : बोरीवली, दहिसरमधील ३५ पुलांची होणार डागडुजी
Mumbai Road Bridges : बोरीवली, दहिसरमधील ३५ पुलांची होणार डागडुजी

मुंबईतील आता पुलांची डागडुजीचे काम हाती घेण्यात येत असून मुंबईतील विविध भागांमधील पुलांची दुरुस्ती केली जात असतानाच आता बोरीवली व दहिसरमधील तब्बल ३५ स्कायवॉकसह पुलांची मलमपट्टी केली जाणार आहे. या तब्बल ३५ पुलांच्या डागडुजीसाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. मुंबईतील उड्डाणपूल, नाल्यावरील पूल, वाहनांकरता भुयारी मार्ग, आकाशमार्गिका, पादचारी पूल, तसेच पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपूल एमएमआरडीएकडून (MMRDA) महापालिकेच्या ताब्यात आली असून त्यानुसार या पुलांचे सर्वेक्षण केले जात आहे. तांत्रिक सल्लागारांच्या सर्वेक्षणानुसार बोरीवली (Borivali) आणि दहिसर (Dahisar) या विभागातील सुमारे ३५ पुलांची किरकोळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. (Mumbai Road Bridges)

(हेही वाचा – Ind vs SA 2nd Test Preview : मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताची मदार फलंदाजांवर आणि त्यातही विराट कोहलीवर)

या सर्वेक्षणानुसार दहिसरमधील (Dahisar) महापालिकेच्या आर उत्तर विभागातील चार पादचारी पुलांसह ११ पुलांची किरकोळ डागडुजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्यावतीने विविध करांसह सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या पुलांच्या दुरुस्तीसाठी स्वस्तिक कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कामांसाठी महापालिकेने ६.६३ कटी रुपयांचा कार्यालयीन अंदाज वर्तवत निविदा मागवली होती, परंतु यासाठी पात्र ठरलेल्या कंपनीने उणे ३३ टक्के कमी दर लावून हे काम मिळवले आहे. त्या कामासाठी पावणे पाच कोटी रुपयांची बोली लावून हे काम मिळवले असून विविध करांसह या कंत्राटाची किंमत साडेसहा कोटींवर पोहोचली आहे. (Mumbai Road Bridges)

महापालिकेने नेमलेल्या एससीजी कन्सल्टन्सी या तांत्रिक सल्लागाराच्या सर्वेक्षणानुसार मुंबईतील एक स्कायवॉड आणि पादचारी पूल आदींसह एकूण २० पुलांची डागडुजी केली जाणार आहे. या पुलांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी विविध करांसह सुमारे १३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या पुलांच्या दुरुस्तीसाठी योगेश कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. या पुलांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या पूल विभागाने १२.२७ कोटी रुपयांचा कार्यालयीन अंदाज व्यक्त केला होता, त्यातुलनेत पात्र कंपनीने २९ टक्के कमी बोली लावून हे काम पावणे नऊ कोटींमध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विविध करांसह हे काम या कंपनीला १३.०८ कोटी रुपयांमध्ये मिळवले आहे. (Mumbai Road Bridges)

(हेही वाचा – SC On Railway Accident : अपघात रोखण्यासाठी रेल्वेने काय उपाययोजना केल्या; सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न)

या पुलांची होणारी किरकोळ दुरुस्ती
दहिसर आर उत्तर विभाग

दहिसर नवीन पूल, दहिसर जुने पूल, फिश मार्केट नाला, जयवंत सावंत, कोकणी पाडा, सेजप पार्क, पाटीलवाडी पादचारी पूल, रतननगर पूल, रतननगर पादचारी पूल, रस्तमजी पूल, रस्तुमजी पादचारी पूल, शांतीनगर पादचारी पूल, सेंट लुईस, वैशाली नगर, वाय.आर.तावडे आदी १५ पूल व पादचारी पुलांचा समावेश आहे. (Mumbai Road Bridges)

बोरीवली आर मध्य विभाग

बोरीवली पश्चिम स्कायवॉक, फॅक्ट्री लेन अर्थात डी जी पालकर, पावनधाम मंदिर, दौलत नगर सिमेंट्री, गोराई पंपिंग, इंद्रायणी नाला (सुमित इमारत), शिवसृष्टी, एकसर नाला मेट्रो जवळ, एकसर नाला दर्गा जवळ, साईबाबा नगर, बोरीवली (पीएस) एसव्ही रोड, बोरभट पाडा, एकसर रोड कब्रस्तान, गोराई नाला, मुलजी नगर, सावरकर गेट क्रमांक ३, कस्तुर पार्क, आनंदीबाई काळे, म्हाडा कॉलनी चिकुवाडी, सुयोग इमारत आदी पादचारी पुलांसह २० पुलांची किरकोळ दुरुस्ती केली जाणार आहे. (Mumbai Road Bridges)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.