Water Leakage Antop Hill : जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर दुसऱ्या जलवाहिनीला गळती, ‘या’ भागात होणार नाही पाणी पुरवठा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ उत्तर विभागातील अॅंटॉप हिल परिसरातील रावजी गणात्रा मार्ग जंक्शन शेख मिस्त्री मार्ग, सी. जी. एस. कॉलनी सेक्टर ६ जवळ गळती लागलेल्या ३०० मि मी व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर ६०० मि. मी. जलवाहिनीला लागल्याचे आढळून आले आहे.

1054
Water Leakage Antop Hill : जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर दुसऱ्या जलवाहिनीला गळती, 'या' भागात होणार नाही पाणी पुरवठा
Water Leakage Antop Hill : जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर दुसऱ्या जलवाहिनीला गळती, 'या' भागात होणार नाही पाणी पुरवठा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ उत्तर विभागातील अँटॉपहिल परिसरातील रावजी गणात्रा मार्ग जंक्शन शेख मिस्त्री मार्ग, सी. जी. एस. कॉलनी सेक्टर ६ जवळ गळती लागलेल्या ३०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर ६०० मि. मी. जलवाहिनीला लागल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या ६०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर आहे. अँटॉपहिल, शीव कोळीवाडा, वडाळा आदी भागांमधील पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला अजुन काही तास लागणार असल्याने या भागात पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापालिका जलअभियंता विभागाने जाहीर केले आहे. (Water Leakage Antop Hill)

(हेही वाचा – SC On Railway Accident : अपघात रोखण्यासाठी रेल्वेने काय उपाययोजना केल्या; सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न)

जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम अवघड

‘एफ उत्तर’ विभागातील अँटॉपहिल परिसरात ३०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीला गळती उद्भवली होती. त्याबाबत दिनांक १ जानेवारी २०२३ माहिती मिळताच या जलवाहिनींच्या दुरुस्तीचे काम लगेचच युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले. याठिकाणी ३०० मि. मी. जलवाहिनीची दुरूस्ती केल्यानंतर दुसऱ्या ६०० मि. मी. जलवाहिनीमधूनही गळती झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ६०० मि. मी. जलवाहिनीच्या दुरूस्तीचे अवघड काम जल अभियंता विभागाने हाती घेतले आहे. (Water Leakage Antop Hill)

या भागातील पाणी पुरवठा सुरळीत

त्यापैकी ३०० मि. मी. व्यासाच्या दुरूस्तीचे काम मंगळवारी २ जानेवारी २०२४ सकाळी पूर्ण करण्यात यश आले आहे. याअनुषंगाने सी. जी. एस कॉलनी, महात्मा गांधी नगर, भारतीय कमला नगर या परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचे महापालिका जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे. (Water Leakage Antop Hill)

New Project 2024 01 02T204725.466

या भागातील पाणी पुरवठा राहणार खंडित

याठिकाणी ६०० मि. मी. जलवाहीनी दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास आणखी काही तासांचा कालावधी लागणे अपेक्षित आहे. त्यामुळे ‘एफ उत्तर’ विभागातील कोकरी आगर, विजय नगर, संगम नगर, दोस्ती एकर्स, हिम्मत नगर, शांती नगर, आझाद मोहल्ला, अँटॉपहिल, वडाळा पूर्व, गणेश नगर, शिवशंकर नगर, नेहरू नगर, इंदिरा नगर, वडाळा ट्रान्झिट कॅम्प, पंजाबी कॉलनी, सेवा समिती, म्हाडा कॉलनी, सायन कोळीवाडा, बी. पी. टी., बंगालीपुरा, राजीव गांधी नगर ई. ठिकाणी आज पाणीपुरवठा होणार नाही, असे जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे. (Water Leakage Antop Hill)

(हेही वाचा – Mumbai Road Bridges : बोरीवली, दहिसरमधील ३५ पुलांची होणार डागडुजी)

रात्री उशिरापर्यंत हे काम सुरूच राहणार

जलवाहिनीला गळती झालेल्या ठिकाणी दुरूस्तीच्या कामासाठी ३५ कामगार-कर्मचारी-अधिकारी कार्यरत आहेत. जलवाहिनीला गळती झाल्याच्या ठिकाणची मात्र जागा ही अतिशय चिंचोळी आणि खोल असल्याने दुरूस्तीसाठी अनेक आव्हाने या दुरूस्ती कामात येत आहेत. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू राहणार असल्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी या कामाची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. (Water Leakage Antop Hill)

पाण्याचा पुरेसा दाब तयार झाल्यावर पुरवठा होणार सुरळीत

त्यामुळे ‘एफ उत्तर’ विभागातील काही परिसरात पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुरुस्ती काम पूर्णत्वास आल्यानंतर जलवाहिनीमध्ये पाण्याचा पुरेसा दाब तयार झाल्यावर एफ उत्तर विभागात पाणीपुरवठा केला जाईल, असे महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे कळविण्यात आले आहे. (Water Leakage Antop Hill)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.