मुंबई महानगरपालिकेच्या पवई वेन्चुरी येथील अप्पर वैतरणा आणि वैतरणा यामधील ९०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनी जोडणीमध्ये गळती आढळून आली आहे. ही गळती रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. या गळती दुरुस्तीसाठी मुख्य वैतरणा जलवाहिनी भांडूप संकुल ते मरोशी बोगदा पर्यंत रिक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही जलवाहिनी रिक्त करून दुरूस्त करण्याचे काम येत्या गुरूवारी ०४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम शुक्रवारी ०५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पूर्व उपनगरात १०० टक्के तर शहर आणि पश्चिम विभागातील दोन वार्डात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. (Water Cut)
या जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात पाणी कपात केला जाणार असून काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील. ह्या पाणीकपाती दरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल. त्यामुळे कालावधीत पाण्यााचा जपून वापर करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. (Water Cut)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे)
अशा प्रकारे होणार पाणी पुरवठ्यावर परिणाम
ए विभाग – मलबारहिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘ए’ विभागातील सर्व क्षेत्रात ( गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल. (Water Cut)
सी विभाग – मलबारहिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘सी’ विभागातील सर्व क्षेत्रात (गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल. (Water Cut)
डी विभाग – मलबारहिल जलाशयातून व थेट पाणीपुरवठा होणारे ‘डी’ विभागातील सर्व क्षेत्रात (गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल. (Water Cut)
ई विभाग – रेसकोर्स टनेल शाफ्टमधून पाणीपुरवठा होणारे ई विभागातील सर्व क्षेत्रात (गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल. (Water Cut)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे)
जी उत्तर व जी दक्षिण विभाग – जी/उत्तर व जी/दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व क्षेत्र व वरळी हिल जलाशयातून पाणीपुरवठा होणारे जी/दक्षिण विभागातील सर्व क्षेत्रात (गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता) पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल. (Water Cut)
एल विभाग – खालील नमुद केलेल्या परिसरांमध्ये गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता अर्थात पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)
६० कॉर्ड मेन वेन्चुरी सप्लाय – बीट क्र. १५६ – अप्परतुंगा, लोअरतुंगा, मारवा, रहेजा विहार, चांदिवली फार्म रोड, साकी विहार रोड, साकीनाका, इत्यादी
बीट क्र. १५७ – राम बाग रोड, चांदिवली फार्म रोड, नाहर अमृतशक्ती, आय.आर.बी. रोड, महिंद्रा क्वारी, विजय फायर रोड, संघर्ष नगर, इत्यादी
बीट क्र. १५८ – खैराणी रोड, मोहिली पाईप लाईन रोड (Water Cut)
७) एस विभाग – खालील नमूद परिसरात गुरूवार दिनांक ४.०१.२०२४ रोजी दुपारी १२.०० ते दुपारी ०४.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्ण बंद राहील. (Water Cut)
आय. आय. टी. पवई क्षेत्र (रामबाग) – म्हाडा जलवायू विहार, राणे सोसायटी, हिरानंदानी पवई, पंचकुटीर, तिरंदाज गावठाण, साईनाथ नगर, गोखले नगर, गरीब नगर, चैतन्य नगर, महात्मा फुले नगर, मोरारजी कंपाऊंड, रमाबाई नगर, हरीओम नगर, स्वामी नारायण नगर, गौतम नगर, इंदिरा नगर इत्यादी. (Water Cut)
एच पूर्व विभाग – एच/पूर्व विभागातील सर्व क्षेत्रात गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल. (Water Cut)
एच पश्चिम विभाग – एच/पश्चिम विभागातील सर्व क्षेत्रात गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल. (Water Cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community