Ind W vs Aus W ODI Series : भारतीय महिलांना ऑस्ट्रेलियाकडून ०-३ असा व्हाईटवॉश 

मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांनी ३३८ ही सर्वोच्च धावसंख्या रचण्याबरोबरच भारतीय संघाचा १९० धावांनी धुव्वा उडवला

195
Ind W vs Aus W ODI Series : भारतीय महिलांना ऑस्ट्रेलियाकडून ०-३ असा व्हाईटवॉश 
Ind W vs Aus W ODI Series : भारतीय महिलांना ऑस्ट्रेलियाकडून ०-३ असा व्हाईटवॉश 

ऋजुता लुकतुके

भारतीय महिलांसाठी २०२४ वर्षाची सुरुवात (Ind W vs Aus W ODI Series) एका मोठ्या लाजिरवाण्या पराभवाने झाली आहे. ऑस्ट्रेलियन महिलांनी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिलांचा १९० धावांनी पराभव केला. मालिकाही ३-० अशी खिशात घातली. पराभवापेक्षा भारतीय संघाच्या जिव्हारी लागला असेल तर गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील गलथानपणा.

ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू असताना भारतीय महिलांना चेंडू पकडणं तर दूर तो अडवणंही शक्य होत नव्हतं. ऑस्ट्रेलियासाठी आज फिबी लिचफिल्डचा दिवस होता. आधी दमदार फलंदाजी करत तिने १२५ चेंडूंमध्ये ११९ धावा केल्या. शिवाय कर्णधार एलिसा हेलीबरोबर तिने १८३ धावांची सलामीही संघाला करून दिली. या भागिदारीनेच ऑस्ट्रेलियन संघासाठी तीनशे धावांची पायाभरणी केली. एलिसाने ८२ धावा केल्या.

(हेही वाचा-Malad Road Winding : या तीन रस्त्यांवरील वाहतूक होणार सुसाट)

त्यानंतर मधल्या फलीत ॲशले गार्डनरने ३० तर ॲनाबेल सदरलँडने २३ धावा करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३०० पार नेली. निर्धारित ५० षटकांत ऑस्ट्रेलियन महिलांनी ७ बाद ३३८ अशी महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या उभी केली.

अमनजोत कौर, रेणुका सिंग, पूजा वस्त्रकार आणि श्रेयांका पाटील अशा सर्वच भारतीय गोलंदाजांनी धावांची लयलूट केली.

त्यानंतर फलंदाजीतही भारतीय संघ कमीच पडला. भारतीय संघातर्फे वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या होती ती २९, सलामीवीर स्मृती मंढाणाने केलेली. त्यानंतर जेमिमा रॉडरिग्ज आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २५ धावा केल्या. बाकी फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. कर्णधार हरमनप्रीत कौर सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरली. तिने फक्त ३ धावा केल्या.

भारतीय संघ १४८ धावांवर सर्वबाद झाला.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.