आसामच्या डेरगावमध्ये बुधवारी (३ डिसेंबर) झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. तर २७ जण गंभीर जखमी आहेत. प्रवासी बस आणि ट्रक यांचा समोरा-समोर भीषण टक्कर होऊन हा अपघात घडला. (Assam Accident)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धार्मिक पर्यटनासाठी एका प्रवासी बसने ४१ जण तिनसुकियामधील तिलिंगा मंदिरात दर्शनासाठी जात होते. ही बस आसममधील डेरगावजवळ असताना पहाटे ५ वाजेच्या सुमाराला एका कोळशानं भरलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. दोन्ही वाहनांची धडक खूप भीषण होती. दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. तसेच, बसमधील १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधून प्रवास करणारे इतर २७ जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Assam Accident )
(हेही वाचा : Adani-Hindenburg Case:अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून अदानी ग्रुपला दिलासा, ‘हा’ दिला निर्णय)
बस आणि ट्रकची धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाला. आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस येण्यापूर्वीच स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले होते. बसमधील जखमींना स्थानिकांनी बाहेर काढले आणि तात्काळ रुग्णालयात पाठवले. बसमधील सर्व प्रवाशांना जवळच असलेल्या जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community