6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा कारसेवकांनी बाबरीचा ढाचा पाडला, तेव्हा मी तिथे उपस्थित होतो आणि मला त्याचा अभिमान आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. मंगळवार, ३ जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.
(हेही वाचा – Ind vs SA 2nd Test : जसप्रीत बुमराह जेव्हा नेट्समध्ये अश्विनची नक्कल करतो )
अयोध्या राममंदिराच्या मॉडेलवर आधारित रामरथाचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हा ते बोलत होते. या वेळी बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजनही (Girish Mahajan) उपस्थित होते.
बदायूं तुरुंगात घालवले दिवस
या वेळी भाजप राममंदिर प्राणप्रतिष्ठा (rammandir pran pratishtha) सोहळ्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहे, या विरोधकांच्या आरोपाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जेव्हा कारसेवा (karseva) शिगेला पोहोचली होती, तेव्हा काही लोक लपून बसले होते. याबद्दल मी काय सांगू ? मी बदायूं तुरुंगातही काही दिवस घालवले होते.”
(हेही वाचा – Virtual Gang Rape: अल्पवयीन मुलीवर व्हर्चुअली सामूहिक बलात्कार; पीडितेकडून तक्रार दाखल, तपास सुरू)
कारसेवेमध्ये तीनदा भाग घेतला
फडणवीस पुढे म्हणाले की, ज्याचा रामावर विश्वास आहे, तोच राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होऊ शकतो. काही लोक कधीच राममंदिराशी संबंधित कोणत्याही आंदोलनाचा भाग नव्हते. मी कारसेवेमध्ये तीनदा भाग घेतला. मला अभिमान आणि आनंद वाटतो की, जेव्हा बाबरी ढाचा (Demolition of the Babri) पाडण्यात आला, तेव्हा मी तिथे उपस्थित होतो.
प्रत्येक मंदिरात कार्यक्रम होणार
ते म्हणाले की, 22 जानेवारीला देशातील एकही मंदिर नसेल, जिथे हा कार्यक्रम साजरा केला जाणार नाही. 500 वर्षांच्या संघर्षानंतर देशात राममंदिराची उभारणी होत आहे. बाबरने आमच्यावर लावलेला डाग आम्ही दूर करण्याच्या प्रक्रियेत आहोत. आपले मतभेद मिटवायला हवेत. हे विसरून रामनामाचा जप झाला पाहिजे. या मुद्द्यावर राजकारण करणे क्षुद्र आहे. (Devendra Fadnavis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community