- ऋजुता लुकतुके
भारतातील युपीआय व्यवहारांचं (UPI transactions) मूल्य या वर्षी १८२ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात ४४ टक्के वाढ झाली आहे. (UPI Payments)
युपीआयच्या माध्यमातून झालेले व्यवहार यंदा १०० अब्जांच्या वर गेले आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही माहिती दिली आहे. या व्यवहारांचं मूल्य चक्क १८० लाख कोटी रुपये इतकं आहे. याचवर्षी ऑगस्टमध्ये युपीआय व्यवहार (UPI transactions) १० अब्जांवर पोहोचले होते. आणि हा मासिक उच्चांक होता. (UPI Payments)
पुढच्या दोनच महिन्यात हा उच्चांक मोडला. आणि डिसेंबर २०२३ मध्ये १२ अब्ज युपीआय व्यवहार (UPI transactions) पार पडले. (UPI Payments)
२०२३ मधील युपीआय व्यवहारांचं (UPI transactions) एकूण मूल्य १८२ लाख कोटी रुपये इतकं होतं. गेल्यावर्षी हेच मूल्य १२६ लाख कोटी रुपये इतकं होतं. म्हणजेच व्यवहारांमध्ये ४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी ३८७ मिलियन युपीआय व्यवहार (UPI transactions) झाले. (UPI Payments)
🚨UPI transactions cross 100-billion mark in 2023
Transactions through the unified payments interface (UPI) platform crossed the 100 billion-mark in calendar year 2023 to close at around 118 billion, as per the data shared by the National Payments Corporation of India (NPCI).…
— Chandra R. Srikanth (@chandrarsrikant) January 2, 2024
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : अयोध्या सोहळ्यासाठी मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’ ; व्यापाऱ्यांकडून आयोजन)
युपीआय व्यवहार मास्टरकार्डला टाकणार मागे
युपीआय व्यवहारांमध्ये (UPI transactions) दिवसा गणिक होणारी वाढ पाहता, येत्या काही दिवसांत युपीआय व्यवहार (UPI transactions) मास्टरकार्डला (MasterCard) मागे टाकतील असा अंदाज आहे. सध्या मास्टरकार्डवर (MasterCard) दर दिवशी सरासरी ४४० दशलक्ष व्यवहार होतात. हा आकडा आणखी काही महिन्यातच युपीआय (UPI) मागे टाकेल असा अंदाज आहे. (UPI Payments)
व्हिसा कार्डांवर दिवसात सरासरी ७५० दशलक्ष व्यवहार होतात. भारतात ९.६ कोटी क्रेडिट कार्ड्स वापरणारे आहेत. पण, कार्ड वापरून होणारे व्यवहार १.६ लाख कोटी रुपये इतक्या मूल्याचे आहेत. म्हणजेच युपीआयच्या (UPI) तुलनेत या व्यवहारांचं मूल्य एक दशांशाने कमी आहे. (UPI Payments)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community