Kushti Federation Row : झाग्रेब स्पर्धेसाठी भारताचा १३ कुस्तीपटूंचा संघ जाहीर

झाग्रेब ओपन कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनिया आणि ४ इतर कुस्तीपटू भाग घेणार नाहीत

215
Kushti Federation Row : झाग्रेब स्पर्धेसाठी भारताचा १३ कुस्तीपटूंचा संघ जाहीर
Kushti Federation Row : झाग्रेब स्पर्धेसाठी भारताचा १३ कुस्तीपटूंचा संघ जाहीर
  • ऋजुता लुकतुके

झाग्रेब ओपन कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनिया आणि ४ इतर कुस्तीपटू भाग घेणार नाहीत.(Kushti Federation Row)

भारतात कुस्तीचा कारभार चालवण्यासाठी नेमलेल्या तात्पुरत्या समितीने झाग्रेबला होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी १३ जणांचा भारतीय संघ जाहीर केला आहे. बजरंग पुनिया, अंतिम पनगल यांच्यासह आणखी ३ कुस्तीपटूंनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. कारण, स्पर्धेपूर्वी तात्पुरत्या समितीला द्यायची संमतीची पत्र या पाच जणांनी दिली नव्हती.(Kushti Federation Row)

अंतिम पनगलला या महिन्यात अर्जुन पुरस्कार मिळणार आहे. आणि तो स्वीकारण्यासाठी ती झाग्रेबमधील स्पर्धेत सहभागी होणार नाहीए. तर बजरंग पुनिया होआंगझाओमध्ये झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत रिकाम्या हाताने परतला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेला नाही.(Kushti Federation Row)

(हेही वाचा – Argentina Jersey No 10 : अर्जेंटिना फुटबॉल संघातून १० क्रमांकाची जर्सी निवृत्त होणार)

कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्या विरुद्ध काही कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनात बजरंग पुनिया सहभागी होता. अलीकडेच त्याने खेलरत्न पुरस्कारही त्यासाठी परत केला होता. आंदोलनाच्या निमित्ताने बराच काळ मैदानाबाहेर घालवलेल्या बजरंगने आता झाग्रेब स्पर्धेपासून लांब रहायचं ठरवलं आहे.(Kushti Federation Row)

तात्पुरत्या समितीने निवडलेल्या संघात अमन शेखावत, यश, दीपक पुनिया, विकी, सुमित मलिक हे आशियाई स्पर्धेत खेळलेले खेळाडू आहेत. महिलांमध्ये सोनम मलिक आणि राधिकाही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.(Kushti Federation Row)

‘आम्ही खेळाडूंकडे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संमती पत्र मागितली होती. पण, फक्त १३ खेळाडूंनीच ती दिली. त्याच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे,’ असं तात्पुरत्या समितीचे अध्यक्ष भुपिंदर बाजवा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं.(Kushti Federation Row)

(हेही वाचा – UPI Payments : २०२३ मध्ये युपीआय व्यवहार पोहोचले १०० अब्जांच्या घरात)

तर बजरंग पुनियाने आपल्या गैरहजेरीसाठी अंगठ्याला झालेल्या दुखापतीचं कारण पुढे केलं आहे. ‘अंगठ्याच्या दुखापतीनंतर मी अजून मॅटवर खेळायला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे स्पर्धात्मक कुस्तीपासून अजून मी लांब आहे,’ असं बजरंग याविषयी बोलताना म्हणाला.(Kushti Federation Row)

झाग्रेब ओपन स्पर्धा १० ते १४ जानेवारी दरम्यान क्रोएशियातील झाग्रेब इथं होणार आहे. अलीकडेच कुस्ती फेडरेशनची वादग्रस्त निवडणूक आणि नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या बरखास्तीमुळे भारतीय कुस्तीत गोंधळ निर्माण झाला होता. आणि या स्पर्धेसाठी संघ निवडून त्यांच्या व्हिसाची सोय करणं यासाठी तात्पुरत्या समितीकडे खूपच कमी वेळ होता.(Kushti Federation Row)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.