स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट जरी घेतली असली तरी त्यांनी या भेटीनंतर महाविकास आघाडीशी असलेली कट्टी कायम असल्याचा पुनरुच्चार केला. (Raju Shetti)
भेट राजकीय नाही
राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, ही भेट राजकीय नसून शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नाबाबत होती. “ठाकरे यांची अडाणी (Adani) उद्योगसमूहाविरुद्ध जी भूमिका घेतली आहे त्या अडानींचा शेतकऱ्यांनाही त्रास होतो आहे. शेतकऱ्यांच्या लढ्यालादेखील त्यांनी पाठींबा द्यावा, यासाठी ही भेट होती आणि त्यांनी पाठींबा देण्याचे आश्वासन दिले,” असे शेट्टी यांनी सांगितले. (Raju Shetti)
महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रश्नच नाही
महाविकास आघाडीसोबत आघाडी म्हणून निवडणूक लढविण्याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले, “महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याचा आता प्रश्नच उद्भवत नाही. दोन वर्षापूर्वीच आम्ही आघाडीतून बाहेर पडलो आणि तेव्हा आम्ही काही आक्षेप घेऊन सहा पानी पत्र शरद पवारांना (Sharad Pawar) लिहिले होते, त्याचे उत्तर आजपर्यंत मिळाले नाही. त्यामुळे आता परत महाविकास आघाडीत जाण्याचा प्रश्नच येत नाही.” (Raju Shetti)
एकला चलो रे
शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) ‘एकला चलो रे’ चा नारा देत लोकसभेच्या सहा जागा स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या मतविभागणीची शक्यता वर्तवली जात असून याचा थेट लाभ महायूतीला होऊ शकतो. (Raju Shetti)
(हेही वाचा – India T20 Team : भारताच्या टी-२० संघ निवडीपूर्वी अजित आगरकर रोहित, विराटशी बोलणार)
चारपैकी ३ खासदार शिंदेंकडे
शेट्टी ज्या सहा जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत त्यात हातकनंगले (धैर्यशील माने, शिवसेना), कोल्हापूर (संजय महाडीक, शिवसेना), सांगली (सांजयकाका पाटील, भाजप), माढा (रणजित नाईक-निंबाळकर, भाजप), परभणी (संजय जाधव शिवसेना) आणि बुलढाणा (प्रतापराव जाधव, शिवसेना) या मतदार संघांचा समावेश आहे. यातील हातकनंगले मतदार संघातून स्वतः शेट्टी लढण्याची शक्यता आहे. यापूर्वी २००९ आणि २०१४ अशा सलग दोन वेळा शेट्टी यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले तर २०१९ मध्ये शिवसेनेचे माने निवडून आले. या सहापैकी चार जागांवर शिवसेनेचे आणि २ भाजपचे खासदार आहेत. शिवसेनेच्या चारपैकी माने, महाडीक आणि प्रतापराव जाधव यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे तर संजय जाधव उबाठा मध्ये आहेत. (Raju Shetti)
तिरंगी लढत होण्याची शक्यता
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या जागांवर आपले उमेदवार दिल्यास या मतदार संघांमध्ये स्वाभिमानी, महाविकास आघाडी आणि महायुती अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता असून महाविकास आघाडीच्या मतविभागणीचा फायदा महायुतीला होऊ शकतो. (Raju Shetti)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community