South Africa Test Team : कसोटी क्रिकेटलाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचं क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं केलं स्पष्ट 

अलीकडेच न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ निवडताना दक्षिण आफ्रिकेनं आपला दुय्यम संघ निवडला होता 

205
South Africa Test Team : कसोटी क्रिकेटलाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचं क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं केलं स्पष्ट 
South Africa Test Team : कसोटी क्रिकेटलाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचं क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं केलं स्पष्ट 
  • ऋजुता लुकतुके

अलीकडेच न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ निवडताना दक्षिण आफ्रिकेनं आपला दुय्यम संघ निवडला होता. (South Africa Test Team)

या आठवड्यात दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाचा एक निर्णय गाजला. कारण, त्यांनी न्यूझीलंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी संघ निवडताना दुय्यम संघ निवडला. असा संघ ज्यातील सात खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलेच नाहीत. आणि फक्त दोघांना कसोटी क्रिकेटचा अनुभव आहे आणि ते दक्षिण आफ्रिकन आंतरराष्ट्रीय संघातले नियमित खेळाडू आहेत. (South Africa Test Team)

असं आफ्रिकन बोर्डानं केलं याला कारण, न्यूझीलंड दौऱ्याच्या वेळी देशात रंगणारी टी-२० लीग स्पर्धा. या लीगसाठी सर्वोत्तम खेळाडू उपलब्ध व्हावेत यासाठी क्रिकेट मंडळाने हा निर्णय घेतला. (South Africa Test Team)

आणि त्यामुळे क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगू लागली की, पारंपरिक कसोटी क्रिकेटपेक्षा क्रिकेट मंडळांनाही आता टी-२० क्रिकेट महत्त्वाचं वाटू लागलं आहे का? कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंचा खरा कस लागतो. ते आव्हानात्मक आहे. पण, प्रेक्षकांची पसंती धुवाधार फलंदाजी, षटकारांची आतषबाजी होणाऱ्या टी-२० क्रिकेटला जास्त आहे. पण, म्हणून क्रिकेटचा कारभार हाकणाऱ्या क्रिकेट मंडळांनीच प्राधान्यक्रमाने टी-२० क्रिकेटचा विचार सुरू केला आहे का अशी चर्चा मग सुरू झाली. (South Africa Test Team)

(हेही वाचा – India T20 Team : भारताच्या टी-२० संघ निवडीपूर्वी अजित आगरकर रोहित, विराटशी बोलणार)

त्यावर दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने बुधवारी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला कसोटी क्रिकेटबद्दल आदर आहे. आणि हाच प्रकार क्रिकेटमधील सर्वोच्च मानाचा आहे, यावरही आमचं दुमत नाही. पण, एसए२० लीग खेळवणं मंडळाच्या आर्थिक गणितासाठी महत्त्वाचं आहे,’ असं क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं स्पष्ट केलं आहे. (South Africa Test Team)

लीगमुळे देशांतर्गत टी-२० लीग चालली तर क्रिकेट संघाचा वार्षिक खर्च उचलता येईल, असं आफ्रिकन क्रिकेट मंडळाला वाटतं. पण, त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेची रंगत कमालीची कमी होणार आहे. किवी कर्णधार केन विल्यमसनने तर या निर्णयाचा निषेध केलाच. शिवाय अलीकडे ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार स्टिव्ह वॉ, भारतीय सुपरस्टार सुनील गावसकर यांनीही या निर्णयावर टीका केली आहे. (South Africa Test Team)

अगदी अलीकडे भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही (Rohit Sharma) कसोटी क्रिकेटलाच आपण सर्वोच्च स्थानी मानतो, असं मत व्यक्त केलं होतं. (South Africa Test Team)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.