Sharad Pawar : शरद पवारांसह पवार कुटुंबावर २ हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप

358

सध्या शरद पवार (Sharad Pawar) हे पक्ष फुटीच्या संकटातून सावरत नाही तोच त्यांच्यावर आणि पवार कुटुंबावर तब्बल २ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला आहे. प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतला घोटाळा अर्थात पीएपी या अंतर्गत हा घोटाळा झाला आहे. त्यामध्ये ज थेट शरद पवार आणि कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. हा घोटाळा 20 हजार कोटींचा आहे. शाहीद बलवा आणि पवारांचे निकटवर्ती चोरडिया यांना लाभ मिळाला असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.

(हेही वाचा – Desert Cyclone : राजस्थानमध्ये भारत-युएईचा संयुक्त लष्करी सराव ‘डेझर्ट सायक्लोन’ सुरू)

दरम्यान किरीट सोमय्या PAP घोटाळ्यात शरद पवार  (Sharad Pawar) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कारवाईची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. PAP घोटाळ्यात पवार परिवारही आहे, असे सोमय्या म्हणाले.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

किरीट सोमय्या म्हणाले की, मुंबई महापालिका ठाकरे सरकारच्या 2000 कोटींच्या PAP घोटाळ्यात आता शरद पवार (Sharad Pawar)  आणि पवार परिवाराचे नावही पुढे आले आहे. भांडूप येथील 1903 सदनिकेचा कॉन्ट्रॅक्ट चोरडीया बिल्डरचा पुणे येथील न्यू वल्ड लँडमार्क एलएलपी ला देण्यात आला. न्यू वल्ड लँडमार्क एलएलपी कंपनीने यासाठी शरद पवारांचे भाऊ प्रताप पवार यांच्या निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीसोबत करार केला आहे. ही जागा प्रताप पवार यांच्यानिओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि कंपनीची आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.