Shri Malang Gad : श्री मलंगगडला मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा 

338

मलंगगडाच्या संदर्भातील तुमच्या सर्वांच्या भावना मला माहिती आहेत. या मलंगगडावर येऊन शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांनी मलंगगड (Shri Malang Gad) मुक्तीसाठी आंदोलन चालू केले. मग आपण ‘जय मलंग, श्री मलंग’ म्हणू लागलो. त्याचाही आपल्याला आनंद आहे. तुमच्या सर्वांच्या मलंगगडमुक्तीच्या भावना आहेत. मला त्या भावनांची कल्पना आहे आणि त्या पूर्ण केल्याविना हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मंगळवारपासून ठाणे आणि पालघरच्या सीमेवर असलेल्या मलंगगड येथे अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे. या हरिनाम सप्ताहमध्ये वारकऱ्यांनी पुन्हा श्री मलंगडाचा (Shri Malang Gad) मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बोलून दाखवला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील आश्वासन दिले. त्यानंतर ‘श्री आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे’ अशी घोषणाबाजी या कार्यक्रमात करण्यात आली. मलंगगडावर नाथपंथियांपैकी ५ नाथांच्या समाध्या आहेत, तसेच श्री मलंगशहा बाबा यांचेही स्थान आहे. असे असूनही हा परिसर सध्या मुसलमानांनी बळकावला असून हिंदूंना केवळ वर्षातील एक दिवस येथे जाण्याची अनुमती असते.

(हेही वाचा Ayodhya Ram Mandir : अयोध्या सोहळ्यासाठी मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’ ; व्यापाऱ्यांकडून आयोजन)

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे? 

प्रतापगडावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. ते अतिक्रमण हटवण्याचे धाडस कुणीही करत नव्हते; परंतु शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी मला धाडसाची शिकवण दिली आहे. त्यामुळे मी मागे हटणार नाही. आपले सरकार राज्यातील पुरातन मंदिरांचे संवर्धन करत आहे. राज्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास केला जात आहे. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराचा विकास केला जाणार आहे. या मंदिरासाठी राज्य सरकारने १३८ कोटी रुपये दिले आहेत. पंढरपूरचाही विकास केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

काय आहे हा वाद? 

गेली अनेक वर्षे ठाणे जिल्ह्यातील हाजी मलंग किंवा श्री मलंग गड (Shri Malang Gad) असा वाद सुरू आहे. या ठिकाणी मुसलमानांची दावा केला आहे. तिथे हिंदूंना प्रवेश दिला जात नाही, केवळ वर्षातून फक्त एक दिवस हिंदूंना प्रवेश दिला जातो. दोन्ही धर्मीय या ठिकाणी दावा करतात. त्यामुळे अनेकदा यावरून या ठिकाणी वाद झालेले आहेत. श्री मलंगड येथे ही समाधी नाथपंथातील संत मच्छिंदरनाथ यांची असल्याचे गोरखनाथ पंथ मानणारे लोक सांगतात. या ठिकाणी दरवर्षी पालखी निघते, रोज पूजा होते, नैवेद्य अर्पण केला जातो. तर दुसरीकडे 13 व्या शतकात येमेनहून आलेले सुफी संत फकीर हाजी अब्दुल रहमान शाह मलंग उर्फ मलंग बाबा यांची ही कबर असल्याचे मुसलमान दावा करतात. हा वाद न्यायालयातही पोहोचला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.