Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची सज्जता

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केलेल्या महायुतीने महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी येत्या १४ जानेवारीला जिल्हावार संयुक्त मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

280
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची सज्जता
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची सज्जता

चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महायुतीने जोरदार सज्जता ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केलेल्या महायुतीने महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी येत्या १४ जानेवारीला जिल्हावार संयुक्त मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. (Lok Sabha Elections 2024)

मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधत येत्या १४ जानेवारीला राज्यातील ३६ जिल्ह्यांत ‘महायुती’तील ११ पक्षांचे संयुक्त मेळावे होणार आहेत. जिल्हा मेळाव्यांना घटकपक्षांचे जिल्हा पातळीवरील प्रमुख नेते, पालकमंत्री तसेच घटकपक्षांनी नेमलेले संपर्क मंत्री उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरीय मेळाव्यानंतर तालुका आणि बूथस्तरीय मेळावे घेण्याचा निर्णय ‘महायुती’ने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत ‘महायुती’ला ५१ टक्के मतांसह ४५ पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. (Lok Sabha Elections 2024)

(हेही वाचा – Veer Savarkar : पुण्यात ६ जानेवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा)

‘महायुती’चे ४५ पेक्षा अधिक उमेदवार होणार विजयी 

फेब्रुवारीमध्ये विभागीय स्तरावर मेळावे होणार असून त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, घटक पक्षांतील नेते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे, विनय कोरे, जयदीप कवाडे, सुलेखा कुंभारे आदी सहभागी होतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले. (Lok Sabha Elections 2024)

राज्यभरातील प्रवासात आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट अनुभवण्यास मिळाली असून राज्यात ‘महायुती’चे ४५ पेक्षा अधिक उमेदवार विजयी होतील. बूथस्तरापर्यंत रचना तयार करून ५१ टक्के मते मिळवण्याचा ‘महायुती’चा निर्धार आहे. मोदी लाट दिसू लागल्यामुळे यापुढील काळात ‘महायुती’मध्ये आणखी मोठे नेते प्रवेश करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Lok Sabha Elections 2024)

(हेही वाचा – Mangal Prabhat Lodha : बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये रोजगाराची संधी)

‘महायुती’तील सर्व घटक पक्षांचे नेते

लोकसभा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस -शिवसेना यांच्यासह ‘महायुती’तील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतील समन्वय वाढावा, यासाठी हे मेळावे होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत साकारण्यासाठी ‘महायुती’चे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले आहेत, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले. तर केंद्रातील मोदी सरकारप्रमाणेच राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक विकास कामे केली आहेत. ही विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी ‘महायुती’च्या घटक पक्षांचे मेळावे होणार आहेत. गावपातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक समन्वय निर्माण होण्यासाठी या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले. (Lok Sabha Elections 2024)

७ जानेवारीला अजित पवार गटाचा मेळावा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने येत्या ७ जानेवारीला मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पदाधिकारी संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाचे मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ यांनी दिली आहे. (Lok Sabha Elections 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.