सध्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या विरोधात INDI Alliance स्थापन करण्यात आली आहे. मात्र त्या आघाडीतचा बिघाडी सुरु झाली आहे. याला कारण थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांची उमेदवारी ठरली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
केरळात कुठूनही राहुल गांधी यांनी निवडणूक लढवू नये
राहुल गांधी यांचा वायनाड येथील मतदार संघ आता INDI Alliance तील भारतीय कम्युनिस्ट पक्ष मागत आहे. त्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून राहुल गांधी यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. हा मतदारसंघ सीपीआयचा पारंपरिक मतदारसंघ आहे, असे सीपीआयचे मत आहे. राहुल गांधींनी वायनाडमधून निवडणूक लढवली तर आघाडीसाठी योग्य ठरणार नाही, असा स्पष्ट संदेश सीपीआयकडून काँग्रेसला देण्यात आला आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी दुसरा मतदारसंघ निवडावा असे पक्षाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, सीपीआयने राहुल गांधींना फक्त वायनाड नाही, तर केरळच्या कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू नये, असे म्हटले आहे. ज्या राज्यात काँग्रेसची भाजपशी थेट लढत आहे, अशा राज्यातून राहुल यांनी लढावे, असे सीपीआयचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये सीपीआयने काँग्रेससमोर ज्या अटी ठेवल्या, त्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही पाठिंबा देत आहे.
Join Our WhatsApp Community