नव्या वर्षात कोरोनाने आरोग्य यंत्रणेची आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्त्याने वाढ होत आहे. केरळ आणि उत्तराखंडामध्ये कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी पाहता निर्देश जाहीर करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात केरळ आणि कर्नाटकमध्ये गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क सक्ती करण्यात आली होती. आणि आता हीच मास्क सक्ती पंजाबमध्ये सुरु करण्यात आली आहे. (Covid – 19)
आधिक मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशातील ११ राज्यांमध्ये JN- 1 व्हेरिएंटच्या एकूण ५११ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकूण १९९ प्रकरण समोर आली आहेत.(Covid – 19)
सध्याची राज्यातील JN.1 ची आकडेवारी
कर्नाटक व्यतिरिक्त केरळ मध्ये १४८ गोव्यात ४७, गुजरातमध्ये ३६, महाराष्ट्रात ३२,तामिळनाडू मध्ये २६, दिल्ली मध्ये १५, राजस्थानमध्ये ४,तेलंगणात २, ओडिशात १, आणि हरियाणामध्ये एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट खूप वेगाने पसरताना दिसत आहे. गुरुग्राम अजमेरसह अनेक शहरांमध्ये या व्हेरिएंटची पुष्टी देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाने बुधवारी (३ डिसेंबर) दिलेल्या माहितीनुसार, देशात पाच नवीन कोरोनाची रुग्णांची मृत्यूची नोंद झाली आहे. तर कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक मृत्यू नोंदविण्यात आला आहे.
(हेही वाचा : उत्तर प्रदेश एटीएसची महाराष्ट्रातील ISIS शी संबंधित ११ संशयितांच्या घरी छापेमारी; महत्वाच्या गोष्टी केल्या जप्त)
महाराष्ट्रातील आकडेवारी
सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाची रुग्णांची संख्या ८३२ झाली आहे. या नव्या JN- 1व्हेरिएंटचे ३२ रुग्ण आहेत. याशिवाय राज्यातील ९ जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या JN- 1 व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. या नव्या व्हेरियंटचे पुण्यात सर्वाधिक १७ रुग्ण आदळून आले आहेत. त्यांनतर ठाण्यात -५ JN- 1चे रुग्ण आहेत. बीड-३,संभाजीनगर-२, कोल्हापूर -१,अकोला-१,सिंधुदुर्ग-१,नाशिक-१,सातारा-१,रुग्णआढळल्याची माहिती मिळाली आहे.
हेही पहा –